Nashik | महामार्गालगत गोंदे फाटा शिवारात आढळला बेवारस मृतदेह

Gonde Phata Shiwar: नाशिक-पुणे महामार्गावर बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ
dead body was found Nashik - Pune highway
नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील गोंदे फाटा शिवारात महामार्गाच्या कडेला मृतदेह आढळलाFile Photo

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील गोंदे फाटा शिवारात महामार्गाच्या कडेला ३० ते ३५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. (dead body was found Nashik - Pune highway)

येथील हॉटेल साई नीलेशसमोर रस्त्याच्या कडेला पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत. त्या पुरुषाला दोबी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड अधिक तपास करीत आहेत. dead body was found Nashik - Pune highway)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news