नाशिक
अमरनाथ यात्रा २०२५ साठी शरणपूर रोडवरील जम्मू ॲण्ड काश्मीर बँकसमोर दुसऱ्या दिवशीही नोंदणीसाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाली. Pudhari News Network

Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा नोंदणी पोलिस बंदोबस्तात

बॅंकेत प्रवेशासाठी हुज्जत, दुसऱ्याही दिवशी गोंधळाची स्थिती
Published on

नाशिक : अमरनाथ यात्रा २०२५ साठी शरणपूर रोडवरील जम्मू ॲण्ड काश्मीर बँकसमोर दुसऱ्या दिवशीही नोंदणीसाठी आलेल्या भाविकांमध्ये शाब्दिक वाद, बाचाबाची असे प्रकार घडलेत. गोंधळसदृश परिस्थिती कामय राहिल्याने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला होता.

अमरनाथ यात्रा २०२५ साठी मंगळवार (दि. १५)पासून नोंदणी सुरू झाली. ही यात्रा कोणत्याही वाहनाने केली, तरी त्याची विहित नमुन्यातील अर्जाव्दारे नोंदणी करणे अनिवार्य असते. भाविकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची सोय उपलब्ध आहे. मात्र, ऑफलाईन नोंदणी केवळ शहरातील जम्मू ॲण्ड कश्मीर बँकेतच होत असल्याचा गैरसमज झाल्याने नाशिकसह अन्य जिल्ह्यातील भाविकांनी पहाटे चारपासूनच येथे गर्दी केली. पहिल्या दिवशी १५० भाविकांसाठीच रजिस्ट्रेशन साईट खूली होणार होती. मात्र बँकेबाहेर लांबच लांब रांग लागली होती. बायोमॅट्रीक नोंदणीसाठी एका तारखेच्या बुकिंगसाठी फक्त ४० भाविकांचेच रजिस्ट्रेशन होऊ शकले आणि नंतर सर्व्हर डाऊनचा फटका बसला. उन्हामुळे काही भाविकांना भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

नाशिक
दुसऱ्या दिवशी बुधवारीही (दि.१६) जम्मू ॲण्ड काश्मीर बँकेबाहेर गोंधळाची स्थिती दिसून आली. Pudhari News Network

दुसऱ्या दिवशी बुधवारीही (दि.१६) बँकेबाहेर गोंधळाची स्थिती दिसून आली. दोन दिवसांपासून रांगेत उभे असलेल्यांना प्राधान्याने बँकेत प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप काही भाविकांनी केला आणि पुन्हा गोंधळ निर्माण झाला. काहींचे परस्परांमध्ये वाद झालेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त मागवावा लागला. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत भाविकांना शिस्तीत रांगेत उभे केले. शिवाय, बँक प्रशासनालादेखील गर्दी व्यवस्थापनाच्या सूचना देण्यात आल्या. डहाणूहून आलेल्या अनेक भाविकांनी नाेंदणीसाठी लॉजमध्येच मुक्काम ठोकला होता. त्यातील अनेक जण दुसऱ्या दिवशीही पहाटे पाचपासून रांगेत उभे राहिलेले दिसून आले.

नोंदणीसाठी काल पहाटेपासून रांगेत उभे होतो. मंगळवारी गर्दीमुळे काम झाले नाही. बँक प्रशासनाचा नियोजनात अभाव दिसून आला. काही दलाल मध्यस्थांनाच आत सोडले जात होते आणि भाविकांना उन्हात ताटकळ उभे राहण्याची वेळ आली.

चेतन दांडेकर, भाविक, डहाणू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news