Ajit Pawar Nashik | बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी दादा मैदानात

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने विधानसभेचा श्रीगणेशा
 Ajit Pawar Nashik tour
उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. file photo
Published on
Updated on

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार गुरुवारपासून (दि ८) जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यातील देवळाली, दिंडोरी, कळवण, निफाड, येवला व सिन्नर विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या तीन दिवसात सर्वच मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यासाठी स्वत: दादा मैदानात उतरल्याची चर्चा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणूकांचा प्रचारच यानिमित्ताने होत आहे.

राज्यात लोकसभा निवडणूकांनंतर आता विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतर्फे जागावाटपांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये १५ पैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचे आमदार निवडले गेले होते. सहाच्या सहा मतदारसंघावर दावा दाखवत राष्ट्रवादीने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आता याच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करत डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. २०२२ मध्ये अजित पवार गटाने सत्ताधारी भाजप आणि सेनेला पाठिंबा दिल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवारांसोबत गेले होते.

 Ajit Pawar Nashik tour
मला मुख्यमंत्री बनवले असते तर सगळी पार्टी आणली असती - उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, दोन महिण्यांपूर्वी झालेेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यात अपयश आले होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक चार आमदार आहेत. तरी देखील पराभवाचा फटका बसत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे निवडून आले होते. या पराभवामुळे अजित पवार गट बॅकफूटवर गेल्याने त्यांचे आमदार शरद पवार गटात जाणाऱ असल्याच्या चर्चा राज्यभर रंगल्या होत्या. हेच आव्हान अजित पवारांनी स्वीकारत जनसंवाद यात्रा सुरु केल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीन दिवसीय दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मतदारसंघातील दिंडोरी, कळवण, निफाड, येवला या चार मतदारसंघात ते पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत महिला मेळावा तसेच कामगार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून पक्षाची ध्येय धोरणे आणि शासनाच्या योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 Ajit Pawar Nashik tour
मी सरकारचा प्रतिनिधी, फसवेगिरी करणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

गटासमोर अनेक आव्हाने 

महत्वाच्या बैठकांना मंत्री भुजबळांची दांडी, आ. माणिकराव कोकाटे यांची काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा, आमदार नरहरी झिरवाळ यांचे शरद पवार गटाकडे जाण्यासाठी प्रयत्न तसेच राज्यातील जरांगे-भुजबळ वादामुळे होणारे राजकीय परिणाम अशी अनेक आव्हाने राष्ट्रवादीसमोर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news