

नाशिक : येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रविवारी (दि. 16) आगमन होत असून, दुपारी 2.30 वाजता त्यांचे हॅलिकॉप्टर पोलिस परेड ग्राउंड येथे उतरेल. तेथून ते मोटारीने गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात जातील. दुपारी 4 वाजता नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय प्रांगणात होणार्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर या न्यायालयांच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 6.45 वाजता भगूर नगर परिषदेतर्फे नगरोत्थान अभियानांतर्गत भगूर शहरासाठी 24.68 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या जेल रोड येथील निवासस्थानी भेट देणार असून, रात्री 9.55 वाजता ते ओझर विमानतळावरून विमानाने पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.