AIMA Index 2025 : आयमातील डोम टू पूर्णपणे बॅटरीवर आधारित - Vedanta Rathi

पर्यावरणपूरक संकल्पनेवर भर
सिडको (नाशिक)
सिडको : अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (औद्योगिक महाकुंभ) उद्घाटनप्रसंगी अनिल सुकलाल. समवेत दीपेंद्रसिंह कुशवाह, ललित बूब, वरूण तलवार, आयुष प्रसाद, अजित कुंभार, साकेत चतुर्वेदी, सोनू प्रभाकर व मान्यवर. (छाया : राजेंद्र शेळके)
Published on
Updated on

सिडको (नाशिक): पर्यावरणपूरक प्रदर्शन हे आयमा प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असून, प्रदर्शनातील एक डोम डिझेलऐवजी पूर्णपणे बॅटरीवर आधारित असल्याची माहिती आयमाच्या हरित ऊर्जा विकास समितीचे चेअरमन वेदांत राठी यांनी दिली. दरम्यान लोकांना हरित ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी (दि. ३०) सकाळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महाप्रीतचे मुख्य महाव्यवस्थापक परेश शेठ यांचे डोम टू मध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको (नाशिक)
AIMA Index 2025 : आयमा महाकुंभ गर्दीने हाउसफुल्ल

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयमाने विविध पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन पैकी एक डोम पूर्णपणे बॅटरीवर आधारित आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद वाटतो. लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा पुरस्कार करावा, याचा आम्ही सातत्याने प्रचार व प्रसार करीत आहोत. लोकांनी कमी मायक्रोनच्या प्लास्टिकचा तसेच प्लास्टिक बॉटलचा वापर टाळावा याबाबत आम्ही जनतेचे प्रबोधन करत असून, प्लास्टिकचे मशीनद्वारे रिसायकलिंग कसे करता येते, याचे प्रात्यक्षिकही आम्ही डोम टू मध्ये दाखवित आहोत. तसेच तेथे पर्यावरणपूरक असे स्टार्टअपही आहेत. त्यात बंगळुरूच्या उरावूसह मुंबईच्या कंपन्यांचाही समावेश आहे, असेही राठी यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयमाने व्यापक पावले उचलली असून, आयमा राइज (आयमा रिस्पॉन्सिबल इंडस्ट्रीज सस्टेनेबल एनर्जी) नावाचा मंच उभारला असून, नाशिकच्या सात नामांकित कंपन्या म्हणजे वृषभ इन्स्ट्रुमेंट, एबीबी, बॉश, डब्ल्यूआरएस एनर्जी, इनोवा रबर्स, श्यामला इलेक्ट्रो प्लेटर्स, डीजीओ एलएलसी आदी कंपन्या त्याच्या संस्थापक आहेत. विशेष म्हणजे या सर्व कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये पर्यावरणपूरक म्हणजे सोलर एनर्जी, पाणीप्रक्रिया योजना, विजेचा कमीत कमी वापर यावर विशेष भर दिला आहे, याची आठवणही राठी यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news