नाशिक : दुग्धजन्य पदार्थ, कडधान्यांमध्ये वारेमाप भेसळ

आरोग्यासाठी धोकादायक: नाशिकमध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री
dairy products
दुग्धजन्य पदार्थांमध्ये होताहेत युरिया, डिटर्जंट पावडर, शॅम्पू, व्हाइट वॉलपेट रसायनांचा वापरfile photo
Published on
Updated on
नाशिक : सतीश डोंगरे

दूध, पनीर, चीज, तूप हे पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी असले, तरी हे पदार्थ भेसळीमुळे आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक ठरत आहेत. या पदार्थांमध्ये विशेषत: दुधात भेसळखोरांकडून युरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च, शॅम्पू, फॅब्रिक कलर तसेच व्हाइट वॉलपेट या रसायनांचा वापर केला जात असून, जिल्ह्यात या भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. अन्न प्रशासनाने गेल्या वर्षभरात २३ लाख १९ हजार ९६७ रुपये किमतीचे नऊ हजार ४६८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले असून, सहा हजार ६४३ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करीत नष्ट केले आहेत.

भेसळखोरांकडून सर्रास भेसळयुक्त पदार्थ विक्रीस आणले जात असून, कडधान्यांमध्ये सर्वाधिक भेसळ केली जात असल्याचे प्रशासनाच्या कारवाईवरून समोर येत आहे. गेल्या वर्षभरात प्रशासनाने जिल्ह्यात २० लाख ६५ हजार ३१६ रुपये किमतीचे २९ हजार ९३४ किलो भेसळयुक्त कडधान्य जप्त केले आहे. त्या पाठोपाठ अल्कोहोल नसलेल्या पेयांचा समावेश असून, नंतर मसाले आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठी भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच तूप, मिठाई, नमकीन, न्यूट्रास्यूटिकल्स म्हणजेच न्यूट्रिशियन आणि फार्मास्यूटिकल्स प्रॉडक्ट्सचे मिश्रण असलेल्या पदार्थांमध्येही भेसळ केली जात असून, कोट्यवधी रुपयांची लाखो किलो भेसळयुक्त पदार्थ जप्त करून ती नष्ट करण्यात प्रशासनास यश आले आहे. याकरिता प्रशासनाकडून विविध ड्राइव्हच्या माध्यमातून वर्षभर कारवाया सुरू आहेत. मात्र, अशातही भेसळखोरांना चाप बसला नसून, भेसळीचे प्रकार सुरूच आहेत.

तुम्ही भेसळयुक्त अन्न खाताय?जाणून घ्या
तुम्ही भेसळयुक्त अन्न खाताय?जाणून घ्या pudhari news network

कडधान्यांमधील भेसळीने कर्करोग

कडधान्यांमध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असून, भेसळयुक्त कडधान्यांचे सेवन केल्यास कर्करोगासारखे आजार जडण्याची शक्यता निर्माण होते. कडधान्यांमध्ये भेसळीसाठी प्रामुख्याने वाळू, संगमरवरी चिप्स, दगड यांचा वापर केला जातो. भेसळयुक्त कडधान्यांचे सेवन केल्यास त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. एस्बेस्टॉस कण किंवा पावडरचा (पॉलिश करण्यासाठी) वापर केला जात असल्याने कर्करोग होतो. रंग वाढवण्यासाठी डाळींच्या जुन्या साठ्यामध्ये मेटॅनिल पिवळा (अनुमती नसलेला खाद्य रंग) जोडला जातो.

विदेशात ब्रॅण्डेड मसाल्यांवर बंदी

चमक, वजन वाढविण्याच्या हेतूने मसाल्यांमध्ये भेसळ केली जाते. कृत्रिम रंग, स्टार्च, माती, खडू पावडर यांचा वापर भेसळीसाठी केला जातो. भारतात अत्यंत ब्रॅण्डेड समजल्या जाणाऱ्या दोन मसाले कंपन्यांवर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये पेस्टीसाइड आणि एथिलिन आॅक्साइडचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news