Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून होणार वसुली; सरकारचा कठोर निर्णय

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेतील नियमबाह्य खात्यांवर कारवाईचा बडगा
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेत नियमबाह्य पद्धतीने आर्थिक लाभ मिळवणाऱ्या पुरुषांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने खात्यात पैसे जमा करणाऱ्या पुरुषांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला.

Ladki Bahin Yojana
Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

एसआयआर संदर्भात भाजपच्या उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागीय बैठकीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या बोर्डीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

भाजपच्या संघटनात्मक बैठकीबाबत बोलताना बोर्डीकर म्हणाल्या, निवडणुका असोत अथवा नसोत, भाजपचे कार्यकर्ते सातत्याने संघटनवाढीसाठी कार्यरत असतात. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी नियोजन आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Ladki Bahin Yojana
Earthquake in Nashik | नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यात 29 भूकंपाचे धक्के; पेठ, सुरगाणा अन् दिंडोरी परिसर हादरला

हवामानातील बदल आणि 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे यंदा दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना वेगाने सुरू असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.

अत्याचार खटले फास्ट ट्रॅकवर

नस्तनपूर येथील दुर्दैवी घटनेबाबत बोर्डीकर यांनी संताप व्यक्त केला. ही घटना खेदजनक असून, प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांना प्राधान्य देऊन अशा खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात येईल. आरोपींना कायद्यानुसार लवकर शिक्षा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news