Abu Salem | अबु सालेमला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या तिघांची दुसऱ्या दिवशीही चौकशी

ठोस माहिती न मिळाल्याने तपासी यंत्रणांनी त्यांना सोडले - सूत्र
Abu Salem
अबु सालेमला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या तिघांची दुसऱ्या दिवशीही चौकशीFile Photo
Published on
Updated on

नाशिक : सन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबु सालेम अब्दुल कयूम अन्सारी याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या तिघांची शुक्रवारी (दि.११) सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. तिघांमध्ये मुंब्र्यातील मैत्रीण, केनियातील व्यावसायिकासह अंधेरीतील वास्तुविशारदाचा समावेश आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस), राज्य गुप्तचर यंत्रणा (आयबी) यांच्या पथकांनी दोन दिवस तिघांकडे चौकशी करीत सालेमला भेटण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस माहिती न मिळाल्याने तपासी यंत्रणांनी त्यांना सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक मध्यवर्ती कारागृहाजवळून गुरुवारी (दि. १०) दुपारी नाशिक रोड पोलिसांसह नाशिक दहशवादविरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेतले. तिघेही अबु सालेमला भेटण्यासाठी आल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे पोलिसांनी मदत सबुरअली चतुर (७४, रा. नैरुबी, केनिया), बहार कौशल समी सय्यद (रा. मुंब्रा, ठाणे) आणि सुलेमान सुलतान खोजा (४६, रा. अंधेरी पश्चिम) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिस तपासात चतुर व सय्यद हे सालेमला भेटण्यासाठी आले होते. तर खोजा दोघांना नाशिकमध्ये घेऊन आला होता. गुरुवारी एटीएस पथकाने तिघांकडे दिवसभर चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी (दि.११) सकाळी मुंबई येथून आयबीचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून नाशिकला एकत्र पोहोचल्याचे तपासात समोर आले. सालेमसोबत तिघांचा संबंध काय, भेटण्याचे कारण, तिघांची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न तपासी यंत्रणांनी केला.

चपखलपणे दिली उत्तरे

तपासी यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, मदत चतुर हा केनियातील रहिवासी असून, तो मोठा व्यावसायिक आहे. त्याचे आठ मॉल, चार हॉटेल्स आणि दोन क्लब असल्याचे समजते. तसेच एका कंपनीचा संचालक असून, मालमत्ता खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करतो. तर बहार सय्यद ही गृहिणी आहे. सुलेमान खोजा हा वास्तुविशारद आणि ज्योतिषी आहे. तिघांनीही चौकशीदरम्यान कोणतेही आढेवेढे न घेता चपखलपणे उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

एक दिवस शहारात मुक्काम

चतुर, सयय्य व खोजा हे तिघेही ९ ऑक्टोबर रोजी सकाळी इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीतील एका नामांकित हॉटेलात मुक्कामी होते. तिघेही १० ऑक्टोबर रोजी अबू सालेम याची भेट घेण्यासाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पोहोचले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news