Robotic Surgery for Dual Cancer | ७८ वर्षीय वृद्धाची दोन कर्करोगांवर यशस्वी मात

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया
Robotic Surgery for Dual Cancer
Robotic Surgery for Dual Cancer AI Pic
Published on
Updated on

जुने नाशिक : पुण्यातील ७८ वर्षीय बालकृष्ण यशस्वी उपचार करण्यात एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले आहे. तोंडाचा कर्करोग आणि मोठ्या आतड्याचा (सिग्मॉइड कोलन) कर्करोग अशा दोन्ही गंभीर आजारांवर आधुनिक तंत्रज्ञान व बहुआयामी उपचार पद्धतीच्या साहाय्याने उपचार करण्यात आले.

Robotic Surgery for Dual Cancer
Digital Ashadhi Wari | तरुण पिढीची डिजिटल आषाढी ; सोशल मीडियावर गाजतेय वारी

विशेष म्हणजे, दोन मोठ्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अवघ्या आठवडाभरात प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यांच्यावर एकाच CARE वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांवर रुग्णाची बायोप्सी, पीईटी-सीटी स्कॅन आणि कोलोनोस्कोपीद्वारे तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्जिकल, मेडिकल आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी तसेच अॅनेस्थेसियोलॉजी विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे चर्चा करून रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडा तयार केला.

उपचाराच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या आतड्याच्या कर्करोगावर अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर तोंडाच्या कर्करोगावर दुसरी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली.

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉ. राज नगरकर यांनी सांगितले की, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत विविध तज्ज्ञांमधील समन्वय, अचूक नियोजन आणि आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराने हे आव्हान पेलता आले.

Robotic Surgery for Dual Cancer
Bairagi's Social Awareness Campaigns |देशभरात भारुडाची पताका फडकविणारे बैरागी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news