नाशिक: शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट | पुढारी

नाशिक: शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

नाशिक: पुढारी वृत्तसेवा : गंगापूर रोड येथील शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज (दि.९) सायंकाळी घडली. वाहनातून ३ सिलिंडर नेत असताना त्यापैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या स्फोटात चारचाकी गाडीचे व एका रिक्षाचे नुकसान झाले. तसेच परिसरातील ऋषिराज होरीझॉन सह इतर इमारतीमधील काचा फुटल्या. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होतो. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग विझवली.

हेही वाचा 

Back to top button