नाशिक : देवळा येथे बंद घराचा फायदा उठवत चोरी | पुढारी

नाशिक : देवळा येथे बंद घराचा फायदा उठवत चोरी

देवळा, पुढारी वृत्तसेवा : बंद घरे सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने एक-दोन दिवस घरे कुलूपबंद दिसली की अशा घरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्ञानेश्वर नगरात सोमवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास बंद घराचा फायदा उठवत चोरट्यांनी ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तुषार सोनवणे यांनी याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ज्ञानेश्वर नगरात राहणारे तुषार सोनवणे हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते. या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश करत ५० हजार ५०० रु.किमतीचा सोन्याचा नेकलेस, १७ हजार ५०० रु.ची सोन्याची अंगठी व तीन हजार रुपये रोख असा ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे .

Back to top button