

नांदगाव, पुढारी वृत्तसेवा : दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याप्रकरणी आई, वडील यांच्यासह पती, सासू – सासरे अशा १० संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नांदगाव तालुक्यात घडली. या दोन वेगवेगळ्या घटना प्रकरणी नांदगाव पोलिसात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बलात्कार आदी कलमान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलींचे लग्न लावून त्या गर्भवती राहिल्यानंतर डिलिव्हरी साठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. त्यानंतर हे प्रकरण लक्षात आले. या प्रकरणी पहिल्या घटनेत पळाशी (ता. नांदगाव) येथील पीडितेचे वडील भगवान नाना पवार, आई वैशाली पवार तर चिंचविहिर येथील पती रवींद्र मधुकर भवर, सासू सुमनबाई भवर, सासरे मधुकर भवर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत पळाशी (ता.नांदगाव) येथील पीडितेचे वडील संतोष विठ्ठल बोरकर, आई शोभा संतोष बोरकर, पती अंकुश श्रावण बोरकर तसेच नांदूर (ता.नांदगाव) येथील श्रावण केदु व्हडगर, सासू संगीता श्रावण व्हडगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आणि बहाकर हे पुढील तपास करत आहे.
हेही वाचा