३४ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ : जळगाव संघाने फुटबॉल खेळात मारली बाजी | पुढारी

३४ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ : जळगाव संघाने फुटबॉल खेळात मारली बाजी

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : ३४ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा अंतर्गत बुधवारी (दि. २२) सकाळी फुटबॉलचा जळगाव विरुद्ध अहमदनगर व नाशिक शहर यांच्याशी सामना पार पडला. जळगाव संघाकडून खेळणारे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व पोलीस उप अधीक्षक ऋषिकेश रावले चोपडा हे सहभागी झाल्याने खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला. दोन्ही सामन्यांमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक यांनी गोल केल्यामुळे इतर खेळाडूंनीही गोल करून विजय प्राप्त केला.

३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पोलीस कवायत मैदानावर सुरू झाल्या असून मंगळवार (दि. २२) दिवसभरात मैदानावर खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, हॅण्डबॉल, हॉकी, फुटबॉल व इतर स्पर्धा पार पडल्या तर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कबड्डी, कुस्ती, जुडोकराटे ४x४०० रीले शर्यत, तिहेरी उडी पोलीस कवायत मैदान ते मेहरूण तलाव ट्रैक परत पोलीस कवायत मैदान अशी १० किलोमिटर धावणे (क्रॉसकंट्री) हे खेळ पार पडले. विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण संघ सहभागी झाले आहेत.

खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ. विशाल जयस्वाल, महेश शर्मा, लिलाधर कानडे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस वेलफेअर शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

बुधवारी पहिल्या सत्रात मैदानी क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडी मध्ये नाशिक शहर प्रथम जळगाव द्वितीय राहिले, ४४४०० रीले शर्यत मध्ये पुरुष प्रथम जळगाव द्वितीय नाशिक शहर तृतीय नाशिक ग्रामीण राहिले महिलांमध्ये प्रथम जळगाव द्वितीय नाशिक शहर राहिले. खो-खो मध्ये जळगाव विजयी राहिले, व्हॉलीबॉल महिला मध्ये नंदुरबार, नाशिक शहर, जळगाव विजय, व्हॉलीबॉल पुरुषमध्ये जळगाव, धुळे, नाशिक शहर विजयौ राहिले, हण्डबॉलमध्ये नाशिक शहर विजय धुळे विजय नंदुरबार विजयी, फुटबॉल स्पर्धेत जळगाव व नाशिक शहर विजयी राहिले. कबड्डी पुरुष स्पर्धेत जळगाव विजय राहिले.

Back to top button