Crime News : चाळीसगावात मालेगावच्या तरूणाला एमडी ड्रग्ज विकताना अटक | पुढारी

Crime News : चाळीसगावात मालेगावच्या तरूणाला एमडी ड्रग्ज विकताना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरून दुचाकीवर एक तरुण २० हजार रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने फिरत असताना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास १२ ग्राम एमडी जप्त करण्यात आले. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीसांनी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की एक तरुण एमडी ड्रग्स घेऊन शहरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकाँ राहुल सोनवणे, पोहेकॉ संदीप पाटील, चापोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ महेश बागुल, पोकॉ संदिप पाटील, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे यांना एमडी ड्रग्स विकणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यास या सूचना करण्यात आल्या.पथकाने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी शेख मोहम्मद आरीफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय-२३) रा. भिवंडी ता. ठाणे ह.मु. जिरे बाबा दर्ग्याजवळ, मालेगाव

याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ विक्रीसाठी आणलेले २० हजार रूपये किंमतीचे १२ ग्रॅम एमडी (MEPHEDRONE) ड्रग्ज आढळून आले. पोलीसांनी त्याला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोकॉ आशुतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button