नाशिक : पाथर्डीफाट्यावर भरधाव जीपने फेरीवाल्यांना चिरडले; एक ठार तर दोन जखमी | पुढारी

नाशिक : पाथर्डीफाट्यावर भरधाव जीपने फेरीवाल्यांना चिरडले; एक ठार तर दोन जखमी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डीफाटा येथे पिकपने रस्त्यालगत बसलेल्या काही विक्रेत्यांना चिरडले. यामध्ये फुल विक्रेता वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर दोन विक्रेते गंभीर जखमी झाले आहे. जीप चालकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंदाबाई गंगाराम अष्टेकर (60, प्रशांत नगर पाथर्डी फाटा) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. यात मंदाबाई अष्टेकर यांचा मृत्यू झाला तर इतर विक्रेते गंभीर जखमी झाले आहेत. जखमेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी वाहन चालकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अष्टेकर यांच्या पश्चात 2 मुले, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button