31st December | मद्यपी वाहनचालकांनो, सावधान ! नाशिक शहरात 'मिशन ऑल आउट' सुरू

मद्यपींसह गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी पोलिस रस्त्यावर
31st December | मद्यपी वाहनचालकांनो, सावधान ! नाशिक शहरात 'मिशन ऑल आउट' सुरू
Published on
Updated on

नाशिक : नववर्षाच्या स्वागतानिमित्त शहरातील हॉटेल्स, पर्यटनस्थळे सजली आहेत. ओल्या, रंगीत संगीत पार्ट्यांचा एकूणच माहोल लक्षात घेत मद्यपी आणि टवाळखोरांसह गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी मिशन ऑल आउट जाहीर केले आहे. त्यानुसार चौकाचौकात पोलिस बंदोबस्त, नाकाबंदी सुरू झाली आहे. तसेच साध्या वेशातही पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जात आहे. मद्यसेवन करून वाहने न चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरासह जिल्ह्यात नववर्ष स्वागत सेलिब्रेशन जोर धरत असल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक मोहीम हाती घेतली आहे. हॉटेल्स, बार, परमिट रूमची नियमित तपासणी पोलिसांकडून होत आहे. सोसायट्यांसह खासगी जागांत विनापरवानगी मद्य पार्टी करणाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तरुण वर्गासह हौशी नाशिककरांनी पर्यटनस्थळांसह रिसॉर्ट, फार्म हाउस व बारमध्ये पार्टीचे नियोजन केले आहे. १ जानेवारी रोजी पहाटे 5 पर्यंत बंदिस्त ठिकाणी परवानगीने 'चिअर्स' करता येणार असल्याने मद्यप्रेमींच्या उत्साहात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस पथके तैनात

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तांसह स्थानिक पोलिसांची, गुन्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत. तसेच वाहतूक पोलिसांची चार पथके, निर्भया व दामिनी मार्शल्सही गस्त घालणार आहेत. यासाठी सुमारे ४० पोलिस निरीक्षक, १५० सहायक व उपनिरीक्षक, दीड हजार अंमलदारांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

'स्टॉप ॲण्ड सर्च' वाढविणार

३१ डिसेंबरनिमित्त शहरात 'स्टॉप ॲण्ड सर्च' कारवाईचे आदेश आहेत. अमली पदार्थांचा वापर कुठेही होणार नाही, यासाठी शोध मोहीम वाढविण्यात येईल. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार असून, नियंत्रण कक्षात त्याबाबत माहिती ठेवली जाईल, असे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news