मित्राचा वाढदिवस साजरा करुन परतताना कारच्या धडकेत २ युवक ठार

पिंपळनेर-सटाणा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात
2 youths killed, one injured while returning from celebrating friend's birthday
मित्राचा वाढदिवस साजरा करुन परतताना २ युवक ठार, एक जखमीFile Photo
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर

पिंपळनेर-सटाणा या राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल शेतकरीनजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल (सोमवार) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातातील मृत व जखमी तरूण पिंपळनेर येथील रामनगर भागातील रहिवासी आहेत. कारचालक फरार झाला असून, त्याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गुलाब लाडे (वय 22), लोकेश चंद्रकांत जाधव (वय 20) हे दोघेही मित्र जय पद्माकर सोनवणे यांच्या दुचाकीने (एमएच 18 सीडी 7847) काल (सोमवार) रात्री घराकडे परत येत होते. यावेळी पिंपळनेरकडून सटाणाकडे जाणाऱ्या कार चालकाने (एमएच 12 एफयु 3088) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात पिंपळनेर येथील रामनगरमधील लोकेश चंद्रकांत जाधव व राहुल गुलाब लाडे हे दोघेही तरुण जागीच ठार झाले. तर दुचाकीस्वार जय पद्माकर सोनवणे हा गंभीर जखमी झाला. कारचालक वाहन जागेवर सोडून पळून गेला आहे. मृत राहुलचे वडील गुलाब रामदास लाडे,रा.रामनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास स पो नी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे हे करीत आहेत.

शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी अतिशय शोकाकुल वातावरणात या दोन्ही तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेने रामनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

काल जयचा होता वाढदिवस

वाढदिवसानिमित्त जय हा आपल्या मित्रांसोबत पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील एका हॉटेलात जेवणासाठी गेला असल्याचे समजते. जेवण आटोपून घराकडे परत येत असतांना काल (सोमवार) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news