Trimbak Raj Rathotsav | 168 वर्षांच्या त्र्यंबकराज रथोत्सवात खंड नको!

Trimbak Raj Rathotsav | मंदिर प्रवेशद्वार ते लक्ष्मीनारायण चौक मिरवणुकीची मागणी
Trimbak Raj Rathotsav
Trimbak Raj Rathotsav
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर (पुढारी वृत्तसेवा):

तब्बल १६८ वर्षांची परंपरा असलेली प्राचीन रथ यात्रा यंदा कार्तिक पौर्णिमा अर्थात २४ नोव्हेंबर रोजी मिरवली जाणार नाही, या साशंकतेने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कुंभमेळ्याचे निमित्त करत शहरातील प्राचीन परंपरांना खंड पडत असेल, तर 'नको तो सिंहस्थ', अशी भावना येथील नागरिकांसह बाहेरगावच्या भाविकांमधून व्यक्त होत आहे.

Trimbak Raj Rathotsav
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

शेकडो वर्षांच्या परंपरेने नागरिक देवदिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे, वर्षभरात विविध उत्सव होत असताना ग्रामीण भागातील भाविक रथोत्सवाला विशेष प्राधान्य देतात. रथ मंदिरात परत येऊन दीपमाळ पेटवली जायची, तेव्हा त्र्यंबकेश्वरच्या गंगा स्लॅबवर बसणारे व्यावसायिक वर्गणी काढून पेढे वाटप करायचे.

याचा अलीकडे शहराची सूत्रे हाती घेतलेल्या कारभाऱ्यांन विसर पडला आहे. गावाच्या परंपरा, रीतिरिवाज मोडीत काढण्यात येत आहेत, त्यामुळे एकसंध असलेली गावसंस्कृती लोप पावत आहे. याबाबत शहरातील ज्येष्ठ नागरिक खेद व्यक्त करत आहेत.

स्लॅब तोडकामाने संतापभर

इतिहासाचे संवर्धन करण्याच्या नावाखाली शासन प्राचीन वस्तूंना धोका पोहोचेल, असे काम करत आहे. कुशावर्त घाटाची आणि परिसरातील मंदिरांची संवर्धनाच्या नावाने होत असलेली हानी आणि जलशुद्धीकरणाच्या कारणाखाली झालेले विद्रूपकरण याबाबत अगोदरच भक्तांच्या मनात नाराजी आहे.

दशक्रिया विधིसाठी असलेली जागा वापरण्यास नागरिकांना मना करण्यात येत आहे. प्राचीन बल्लाळेश्वर गणपती मंदिरातील श्रीगणेशाच्या मूर्तीला क्षती पोहोचवली आहे, तर गोदावरी मंदिराच्या दगडी चिंयाची तोडफोड झाली आहे. यांसारखे अनेक लहान-मोठे नुकसान विकासाकामाच्या नावाने सुरू आहे. त्यातच रथोत्सवाला बाधा येईल अशा पद्धतीने नेमक्या ठराविक कालावधीत सुरू केलेले गंगा स्लॅबचे तोडकाम नागरिकांच्या संतापत भर घालणारे ठरत आहे.

Trimbak Raj Rathotsav
Trimbakeshwar Temple Security | त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांकडून सुरक्षाक्षक महिलेला मारहाण

रथोत्सवाच्या परंपरेला बाधा नको

रथोत्सवाच्या परंपरेला बाधा नको म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारापासून ते लक्ष्मीनारायण चौकापर्यंत पारंपरिक पद्धतीने रथ काढावा. तनंतर पुढे भगवान त्र्यंबकराजचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीत ठेवून कुशावर्त घाटावर घेऊन जावा आणि पूजाविधी व स्नान झाल्यावर पुन्हा लक्ष्मीनारायण चौकापर्यंत पालखीून आणावा.

तेथून रथात ठेवून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर प्रवेशद्दारी आणून अशा परंपरेने रथोत्सव साजरा करावा, अशी बहुतांश नागरिकांची इच्छा लोकचर्चेतून व्यक्त होत आहे. मात्र, रथोत्सवात खंड पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.