Ashok Kharat Case | खरातच्या 160 जीबी डेटामधील ‘न्यूड फाईल्स’ जप्त

फॉरेन्सिक तपासणीतून लॅपटॉप, चार पेनड्राईव्ह, 64 जीबी क्षमतेचे ओटीजी डिव्हाईस हस्तगत
Ashok Kharat Case |
Ashok Kharat Case | खरातच्या 160 जीबी डेटामधील ‘न्यूड फाईल्स’ जप्त
Published on
Updated on

नाशिक : अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या भोंदू अशोक खरातचे फासे आता पूर्णत: फिरले आहेत. त्याच्याकडे असलेल्या डिजिटल उपकरणांमधून खरातचा काळा चेहरा समोर आल्याने तपास यंत्रणाही हादरली आहे. फॉरेन्सिक तपासणीतून एसआयटीने खरातच्या कृत्याचा 160 जीबी (गीगाबाईटस्) डेटा जप्त केल्याने खरातचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक तपासणीतून लॅपटॉप, चार पेनड्राईव्ह, 64 जीबी क्षमतेचे ओटीजी डिव्हाईस हस्तगत करण्यात आले आहेत.

सुरुवातीला पोलिसांना असहकार्य करणारा खरात आता पोपटासारखा बोलत असल्याने त्याचे दररोज धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. एसआयटीकडून खरातचा बंगला, ऑफिससह विविध ठिकाणी छापे टाकत सबळ पुराव्यांची जुळवाजुळव केली जात आहे. खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीमधील दुष्कृत्य कर्मचार्‍याने सुरुवातीला 64 जीबी (गीगाबाईटस्) क्षमतेच्या मूळ पेनड्राईव्हत साठविले होते. यानंतर हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी 32 जीबी क्षमतेच्या अन्य तीन पेनड्राईव्हमध्ये कॉपी पेस्ट केल्याचे उघड झाले आहे. या चारही पेनड्राईव्हमधील एकत्रित डेटा 160 जीबीच्या आसपास असून, त्यात अनेक महिलांचे शोषण केल्याचे व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 160 जीबी डेटामध्ये अनेक धक्कादायक बाबी असून, राज्यातील बडे नावे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दोन 70 पानी रजिस्टरही ताब्यात

खरातच्या कार्यालयातून दोन 70 पानी रजिस्टरदेखील जप्त करण्यात आले आहे. दोन्ही रजिस्टरमध्ये भक्तांची नावे, पत्ते आढळले आहेत. खरातकडे येणार्‍या प्रत्येक महिला आणि पुरुष भक्ताची नोंद डायरीत केली जात असे. एसआयटीने दोन नोंदवह्या जप्त केल्या आहेत. या वह्यांमध्ये समाजातील प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ व्यक्तींची नावे असून, काही गावांच्या नोंदी आढळल्या आहेत. या नोंदवह्यांच्या आधारे आता एसआयटी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

खरात प्रकरणात नव्या पात्राची एन्ट्री

या संपूर्ण रॅकेटमध्ये खरातला बनावट खडे (रत्ने) पुरवणारा नाशिक रोड येथील मुख्य सूत्रधार संशयित महेश कलंत्री असल्याचे निष्पन्न झाले आहे. कलंत्री हा खरातला पुष्कराज, माणिक यासारखी बनावट रत्ने बनवून देत होता, ज्यांचा वापर करून खरात लोकांची फसवणूक करत असे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

खरातचा डिजिटल पुरावा असा

32 जीबीचे 3, 64 जीबीचा 1 पेनड्राईव्ह

तीन पेनड्राईव्हमध्ये प्रत्येकी 19 फोल्डर्स

एकूण 160 जीबी डेटा

सिल्व्हर लॅपटॉप आणि चार्जर

पाच इंच जाडीची प्लास्टिक पन्नी, वाघाची बनावट कातडी

ओकस प्रॉपर्टीजमधील अभ्यागतांच्या नोंदीचे लाल रजिस्टर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news