

नाशिक : देशातील सर्वात प्रतिष्ठित जेईई अभियंत्रिकी प्रवेश परीक्षा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, स्पेक्ट्रम अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर या शाखांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या शहरात गुणवत्ता सिद्ध करत स्पेक्ट्रम अकॅडेमीच्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटविला आहे.
यश सोनवणे या विद्यार्थ्याने जेईईमध्ये देशपातळीवर १२८ वा क्रमांक पटकावला असून, त्याने (99.61) पर्सेंटाईल मिळवले. स्पेक्ट्रम अकॅडेमीचे तब्बल 100 पेक्षा अधिक विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले असून, यामध्ये 28 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त पर्सेंटाईल आणि 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवली आहे. १२ वीच्या परीक्षेतही यशाची परंपरा जपत घवघवीत निकाल नोंदविला आहे. आकाश झारे (88.33), प्रियांका जमधाडे (86.5), प्रांजल ब्रह्मराक्षस (86), पंकज सोनवणे (85.33), सलार सय्यद (85.33), मृण्मयी बर्वे (85.17), उत्कर्षा कदम (84.83), स्वरा चौधरी (84.67) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. यंदा अकॅडेमीचे 90 विद्यार्थी 80% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले. संपूर्ण यश विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे आहे. आम्ही केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावली असल्याचे स्पेक्ट्रम अकॅडेमीचे संचालक प्रा. सुनील पाटील यांनी सांगितले.