

नगरसूल अंतर्गत येणाऱ्या नीलकवस्ती, महालगाव, कोतकर, येवले, जाधव, भनगडे वस्ती, मूळबाईघाट, कटके वस्ती, कापसे वस्ती, माळवाडा, रावते वस्ती, मोढांळा, चिंचलेवाडी, खैरनार वस्ती, दादामळा, सोनवणे वस्ती आणि पहाडे वस्तीवरील ८,१४५ नागरिक थेट टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
Yeola villages face severe water shortage
येवला : संतोष घोडेराव
तालुक्यात यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील १२ गावांसह २३ वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई अजून कायम आहे. तब्बल २३ हजार ६६२ नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. येवला पंचायत समितीने प्रसिद्धीस दिलेल्या दि. १७ ते २४ ऑगस्टदरम्यानच्या अहवालातून ही गंभीर परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
सप्टेंबर उजाडला, तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे झालेले नाहीत. त्यामुळे विहिरींनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. मुख्य गावांसोबतच वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा योजनांचा अभाव असल्यामुळे तिथे प्रशासनाला टँकरने पाणी पोहोचवावे लागत आहे. प्रशासकीय अहवालानुसार तालुक्यातील विविध गावे आणि वाड्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
66 ऐन पावसाळ्यात तालुक्यातील २३ हजारांहून अधिक नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. पावसाळ्यातही टँकरच्या फेऱ्यांची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
- संभाजी पवार, सावरगाव
उन्हाळ्यापासून सुरू असलेले टँकर आजपर्यंत चालू आहे. विहिरींना पाणी नाही. कमी पावसामुळे पिके करपत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा भविष्यात मोठा प्रश्न भेडसावणार आहे.
- रामभाऊ डुंबरे, देवठाण
९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासनाकडून ९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी नांदूर येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे.
टंचाईग्रस्त गावांची लोकसंख्या
देवठाण - २,१४६,
चांदगाव - १,९८७,
भुलेगाव - १,८४५, खैरगव्हाण -
१,४२३, आडसुरेगाव - १,२५८, नायगव्हाण - १,२४२, पांझरवाडी - १,०८५, सावरगाव -९१६, आहेरवाडी - ८७६, तांदूळवाडी - ७४४, कासारखेडे -७१०, संतनगर - ६८०, धनकवाडी - ६०५