

देवळा; पुढारी वृत्तसेवा : गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलन केले व केंद्र सरकारला निर्यात शुल्क शुन्य करण्यास भाग पाडले होते .आज दुर्दैवाने तसे झाले नाही .जिल्हयात शेती व्यवसाय उध्वस्त होताना दिसत असून दुसरीकडे निसर्ग कोपला आहे .यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता असतांना मतदार संघातील विद्यमान मंत्री कांदा व इतर शेतमाल भावा प्रश्नी मुगगिळून बसले आहेत . अशी खंत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली .
देवळाभूमी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा गुरुवारी दि ५ रोजी प्रथम वर्धापनदिन सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते .चव्हाण पुढे म्हणाले की ,शेतकऱ्यांना ऍग्रो प्रोड्युसर कंपनी,मार्फत नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असल्याने ती काळाची गरज आहे. आज शेतकऱ्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत असून,जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील आहेत .शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात प्रोड्युसर हब झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. या कंपन्यांना शेतकऱ्यांनी प्रोत्साहन दिले पाहिजे . मागील काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडले होते ते मी परत करायला भाग पाडले .असेही शेवटी चव्हाण यांनी सांगितले . याप्रसंगी प्रयोगशील शेतकऱ्यांचा माजी खासदार चव्हाण ,किशोर चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सीताराम चौधरी ,निरंजन पाटील ,गोपाल देशमुख , बाजार समितीचे सचिव माणिक निकम ,अड मनोज शिंदे , समीर चव्हाण , नगरसेवक संतोष शिंदे , निबा निकम ,पवन अहिरराव, धनंजय आहेर,हर्षद मोरे, सुधीर मराठे ,सुनील देवरे, राजेंद्र केदारे ,पंडित पाटील , निबा आहेर, दिलीप जोंधळे , भाऊसाहेब रौदळ, निबा आहेर, ग्यानदेव पगार , देवा भामरे ,नाना मगर ,दीपक जाधव ,दुलाजी आहेर ,वैजनाथ देवरे ,दिनकर आहेर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार कंपनीचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मानले .