नंदुरबार - शहादा तालुक्यातील कोंढावल आणि नजीकच्या गावांमध्ये परतीचा अवकाळी पावसामुळे व जोरदार वादळामुळे केळी व पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान; तातडीने या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले.
डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्याप्रसंगी अनेक ठिकाणी उध्वस्त झालेल्या केळी बागा दिसून आल्या. कापूस पपई आणि इतर पीक सुद्धा वादळाने उध्वस्त झालेले दिसले. संबंधित विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते त्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय स्तरावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही होईल, असे सांगून याप्रसंगी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
उद्योजक शशिकांत भाई पाटिल, कृष्णा भाऊ कोली, लोकनियुक्त सरपंच गोपाल भाऊ भील समता परिषद नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, तंटा मुक्ति अध्यक्ष दिपक अहिरे, ग्रां पं सदस्य निंबा नाना माली, रूबदास भील, ब्रिजलाल भील, नारायण अहिरे वडाली उपसरपंच अभय गोसावी, भिमराव अहिरे, विष्णु भील,गणेश माली, युवराज शेवाले, संदीप महाले, संजय पटेल, राजेंद्र माली, कृष्णा भील, दीपक अहिरे,माना माली आदि सह गावकरी शेतकरी उपस्थित होते.