

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या ) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. (Gram Panchayat Election)
यात नाशिक जिल्ह्यातील 48, धुळे जिल्ह्यातील 31, जळगाव जिल्ह्यातील 168, अहमदनगर जिल्ह्यातील 194 आणि नंदुरबार जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा निवडणूक कार्यक्रम आहे. (Gram Panchayat Election)
तहसीलदार कार्यालयाकडून दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी नोटीस जाहीर होईल. 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशन दाखल करणे, 23 ऑक्टोबर रोजी छाननी नंतर 25 ऑक्टोबर रोजी माघार आणि निवडणूक चिन्ह वाटप, दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान आणि 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
हेही वाचा