Stray Dog Attack |नंदूरबारमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला जबर जखमी; चेहऱ्यावर चावे घेतल्याने झाल्या अनेक जखमा!

भटक्या कुत्र्यांना आवर घातला जात नसल्यामुळे नागरिकांमधून पुन्हा संतप्त प्रतिक्रिया
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on: 
Updated on: 

नंदुरबार - अंगणात खेळत असलेल्या लहान मुलावर हल्ला करून भटक्या कुत्र्यांनी त्याला जबर जखमी केल्याची खळबळ जनक घटना घडली. शहरातील कोरीट रोड परिसरातील जयचंद नगर कॉलनीत ही घटना घडली असून शासकीय रुग्णालयात जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनसार, कोरीटरोड परिसरातील जयचंद नगर या कॉलनीत राहणारा लहान मुलगा शिवांश सोनी हा आपल्या मित्रांसमवेत घराबाहेरील अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याचे किंचाळणे आणि अन्न लहान मुलांचे आरडाओरड ऐकून काही जण धावून आल्याने त्याची वेळेवर सुटका होऊ शकली. परंतु या हल्ल्यात शिवांशला कुत्र्यांनी गंभीर जखमी केले आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आणि तोंडावरील जखमा गंभीर असून पालक कमालीचे हादरले आहेत. घटनेनंतर जखमी शिवांशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार चालू आहेत.

Dog Attack
Umarkhed Stray Dog Attacks | उमरखेडमध्ये मोकाट श्वानांचा उच्छाद; आठवडाभरात २५ जणांना चावा

दरम्यान, भटक्या कुत्र्यांना आवर घातला जात नसल्यामुळे नागरिकांमधून पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दर काही महिन्यानंतर भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर येतो, परंतु पुढे काहीच घडत नाही; हा अनुभव शहरवासी गेल्या दहा वर्षापासून घेत आहेत. पाच वर्षांपूर्वी झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून एका मुलीचा बळी घेतला होता. शहरातील नागरिकांनी तेव्हाही मोठा संताप व्यक्त केला होता.

नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून कडक उपाययोजना करणार असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. काही पथके नेमून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती. तरीही नंदुरबार शहराच्या अनेक वसाहतींमध्ये आणि कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जैसे थे बनला आहे. कत्तलखाने चालवल्या जाणाऱ्या परिसरात, साखरी नाका, आंबेडकर चौक, नवनाथ टेकडी परिसर यासह सर्व नव्या वसाहतींमध्ये झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांची दहशत दिसून येते. काही दिवसापूर्वीच धुळे रोड वरील नेहा पार्क परिसरात पिसाळलेल्या एका कुत्रीने लचके तोडत एका मागून एक पाच ते सहा लहान कुत्र्यांना ठार मारल्याची घटना घडली.

अशा सर्व पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नंदुरबार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मांडले जातात. परंतु प्राणी प्रेमी संघटना वाल्यांमुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे कुत्रे नष्ट करायला बंधन असल्याचे स्पष्टीकरण नगरपालिकेकडून प्रत्येक वेळी दिले जात असते. तथापि नगरपरिषदेनेच तातडीने भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.