नंदुरबार जिल्हा पोलीस दलात "स्मार्ट ई-बीट" प्रणाली कार्यान्वित

जीपीएस द्वारे सर्वत्र ठेवणार लक्ष
"स्मार्ट ई-बीट" प्रणाली
"स्मार्ट ई-बीट" प्रणालीPudhari News Network
Published on
Updated on

नंदुरबार : जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हयात "स्मार्ट ई-बीट" प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

Summary

धार्मिक स्थळे, एटीएम, बँका, रहिवासी भाग, शाळा, बाजारपेठ परिसर, रेल्वे, बस स्थानक आणि गावांचा समावेश असून सर्व ठिकाणी GPS प्रणालीद्वारे रोज 24 तास गस्त घालण्यासाठी ही "स्मार्ट ई-बीट" प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

एक अभिनव पाऊल

जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवणदत्त यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, या प्रणालीचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सोमवार (दि.7) रोजी उद्घाटन करण्यात आले. आता सदर प्रणाली जिल्हयाभरात कार्यान्वित करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीसांकडून जनतेच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थिती वाढविण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे.

नंदुरबार
बीट मार्शलद्वारे स्मार्ट ई-बीट प्रणालीतून गस्तPudhari News Network

बीट मार्शलद्वारे गस्त

जिल्हयातील महत्वाच्या ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीकृत "स्मार्ट ई-बीट" प्रणाली लागू करण्यात आली असून त्यात धार्मिक स्थळे, एटीएम, बँका, रहिवासी भाग, शाळा, बाजारपेठ परिसर, रेल्वे, बस स्थानक आणि गावांचा समावेश आहे. यामध्ये सर्व ठिकाणी GPS प्रणालीद्वारे जिओ-टॅग करण्यात आले असून त्याद्वारे 24*7 अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल्सना स्मार्ट ई-बीट सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्यात आले आहे. सदर बीट मार्शल हे दोन शिफ्टमध्ये ठरवलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील. तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, वरीष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षातील अधिकारी देखील संबंधित बीट मार्शल यांचेवर लक्ष ठेवू शकतील व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करु शकतील.

"स्मार्ट ई-बीट" प्रणालीची वैशिष्टये

  • पोलीस कार्यप्रणालीचे डिजीटायझेशन

  • घडणा-या घटनांची तात्काळ माहिती उपलब्ध होणे

  • हद्दीतील गुन्हेगारांची तात्काळ माहिती मिळणेसाठी

  • चोरीस गेलेल्या वाहनांचा तात्काळ शोध घेणेसाठी

  • महत्त्वाचे व गंभीर घटनांची माहिती तात्काळ प्रसारित करण्यासाठी

  • बीट मार्शलचे कामगिरीचा अचूकपणे आढावा घेणेसाठी

  • गुन्हेगारीचे हॉटस्पॉट व क्राईम हिट मॅप्ससाठी

बंद घरात बीट मार्शलकडून विशेष गस्त

स्मार्ट ई-बीट प्रणालीमध्ये आणखी एक महत्वाचे वैशिष्टय म्हणजे "लॉक्ड होम अलर्ट सेवा" असून यामध्ये नागरिक हे कोठे बाहेरगावी जात असल्यास ते आपल्या बंद घराची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कळवतील, त्याद्वारे सदर भागात बीट मार्शलकडून विशेष गस्त घालण्यात येईल व काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास घर मालकाला तत्काळ सुचना देखील पाठविली जाईल.

जलद आढावामुळे नागरिकांना विश्वास मिळवून देण्यास पात्र

सदर तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हयातील सर्व बीट मार्शलचे कामगिरीचा आढावा काही सेकंदात घेता येतो, ज्यामुळे बीट मार्शल्सचे कामामध्ये पारदर्शकता सुनिश्चित होते. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या गुन्हे आढावा बैठकीत सदर "स्मार्ट ई-बीट" प्रणालीची कामगिरी तपासून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या बीट मार्शलचा सन्मान देखील करण्यात येणार असून या नवीन संकल्पनेमुळे पोलीस विभाग अधिक स्मार्ट, जलद आणि प्रभावी होऊन नंदुरबार जिल्हयातील नागरिकांना सुरक्षितता आणि विश्वास मिळवून देण्याचे काम या "स्मार्ट ई-बीट" प्रणालीद्वारे होणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news