Nandurbar ZP Bribe | नंदुरबार जिल्हा परिषदेत खळबळ; लाच घेताना दोन अधिकाऱ्यांसह कंत्राटी अभियंता 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

Nandurbar Zilla Parishad Engineer Arrested

नंदुरबार: वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी लाच स्वीकारताना कंत्राटी अभियंता आणि नंदुरबार जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शहादा पंचायत समितीतील अभियंता पकडला जाण्याची ही अलीकडील दुसरी घटना असून, जिल्हा परिषद अंतर्गत अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे.

या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी अभियंता भूपेंद्र सरचंदराव राठोड (वय 31, रा. शिवसुंदरम नगर, शहादा), नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक रमेश मन्साराम बागुल (वय 56, रा. सुप्रिया नगर, नंदुरबार) तसेच सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश जगजीवनदास शहा (वय 51, रा. देसाईपुरा, नंदुरबार) यांचा समावेश आहे.

Bribe Case
Nandurbar Crime | मुले पळवणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण; नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत कुकावल येथील वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास 31 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी देण्यात येऊन सुमारे 2 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता.

मात्र, मंजुरी आदेशाची प्रत मिळत नसल्याने तक्रारदाराने 27 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन वरिष्ठ सहाय्यक रमेश बागुल यांची भेट घेतली. त्यावेळी बागुल यांनी तक्रारदारास कंत्राटी अभियंता राठोड यांना 20 हजार रुपये देण्यास सांगितले आणि त्यानंतरच आदेशाची प्रत मिळेल असे स्पष्ट केले. या व्यवहारास सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनीही पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.

Bribe Case
Nandurbar News | 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर नंदुरबार प्रशासन सतर्क; चारा सुरक्षा आराखड्याची तयारी सुरू

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तातडीने कारवाई करत सापळा रचण्यात आला आणि 29 एप्रिल 2026 रोजी ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना कंत्राटी अभियंता राठोड यांना पथकाने रंगेहात पकडले.

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस कर्मचारी विजय ठाकरे, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, तसेच इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news