नंदुरबार : रॉयल्टी विचारल्यावरून ग्राम महसूल अधिकाऱ्याला घरात घुसून धमकावले

रेती तस्करांची मुजोरी पुन्हा चर्चेत
Nandurbar News
रॉयल्टी विचारल्यावरून ग्राम महसूल अधिकाऱ्याला घरात घुसून धमकावले.
Published on
Updated on

नंदुरबार : रेती वाहतूक करणारे डंपर थांबवून रॉयल्टीची (पावती) विचारणा केल्याने ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या थेट घरात घुसून त्याला सात-आठ जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डंपर चालकांची व रेती तस्करांची मुजोरी चर्चेत आली आहे.

नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण ते काकर्दा रोडवर अवैध रेतीची वाहतूक करणारा डंपर (क्र. MH- ३९ AD- १०५५) ग्राम महसुल अधिकारी हरीष बाळु पाटील (रा. नंदुरबार) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी डंपर थांबवून चालकाकडे रॉयल्टी (पावती)ची विचारणा केली. यावेळी रवि पवार यांच्याशी बोला, असे म्हणून चालकाने कोणतीही अधिकृत कागदपत्रे न दाखवता बेदरकारपणे डंपर घेऊन तो निघून गेला. त्यानंतर रात्री ८.३० वाजता विकास पवार हा सहा ते सात जणांना घेऊन आमची गाडी का अडवलीस, असे ग्रामसेवकाला विचारले. तु आमची गाडी अडवलीस तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब रेवगडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news