

नंदुरबार - सातपुड्याच्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्थापित केलेली 'आमु आखा एक से' शेतकरी उत्पादक कंपनीने दिल्ली येथील ग्रामीण भारत महोत्सव मध्ये सहभाग घेतला. त्या माध्यमातून गल्ली ते दिल्लीचा केलेला प्रवास लक्षवेधी ठरला आहे.
ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. 4 ते 9 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात वित्तमंत्री निर्मला सितारमन, वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित होते.
यामध्ये संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक कंपनी, भौगोलिक नामांकित उत्पादक तसेच हस्तकला,सेंद्रिय उत्पादन, महिला बचत गट यांच्या मार्फत बनविलेले विविध वस्तूचे 186 स्टॉल प्रदर्शनात लावण्यात आले. यात भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत नाबार्डच्या अर्थसाहाय्यने DSC संस्थेच्या मार्गदर्शनाखालील स्थापित 'आमु आखा एक से' शेतकरी उत्पादक कंपनी धडगाव मार्फत GI नामांकित आमचुर, आमचुर पावडर तसेच पारंपारिक पद्धतीने तयार केलेलं तूर डाळ, उडीद दाळ, मठ डाळ तसेच हात सळीचे लाल तांदुळ व GI नामांकित नंदुरबारची मिर्ची पावडरचे स्टॉल लावण्यात आले. हे स्टॉल नाबार्डचे CGM,MD तसेच इतर अधिकारी यांनी भेट दिली. या कार्यक्रमात कंपनीचे संचालक लालसिंग वळवी DSC संस्थेचे आसिफ शेख व यशपाल पटेल यांनी सहभाग घेऊन स्टॉल लावले होते.