नंदुरबार - नंदुरबार शहरा लगतच्या मधुबन कॉलनी पासून धुळे चौफुली व भोणे फाटा पर्यंतच्या परिसरात गेल्या महिन्याभरापासून मुक्तपणे भटकंती करणारा बिबट्या पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले. अनेकदा प्रयत्न करूनही तो पिंजऱ्यात अडकत नव्हता परंतु काल रात्री तो अलगदपणे पिंजऱ्यात अडकला.
नंदुरबार शहरा लगतच्या मधुबन कॉलनी पासून धुळे चौफुली व भोणे फाटा पर्यंतच्या परिसरात गेल्या महिन्याभरापासून एक बिबट्या मुक्तपणे भटकंती करून अधून मधून दर्शन देत होता आणि त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. नंदुरबार शहरापासून काही अंतरावर धुळे रस्त्यालगत मधूबन कॉलनी ही नवीन वसाहत आहे. सदर वसाहत डोंगर परिसर व शेतालगत आहे. या परिसरातच बिबट्याने आपला मुक्काम ठोकला होता. थेट शहरातच बिबट्याने आपले प्रस्थ जमवले यावर सुरुवातीला लोकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, मधूबन कॉलनी परिसरातील रहिवाशांना आपल्या घरातूनच बसल्या बसल्या बिबट्याचे दर्शन घडल्याने नागरीकांमध्ये भिती पसरली, हा बिबट्या डोंगरावर जावून उभा राहत असत्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. काहींनी व्हीडीओ तयार करुन सोशल मिडीयावरही प्रसारीत केले. तेव्हा नंदुरबार मध्ये बिबट्या फिरत असल्याच्या गोष्टीवर इतर शहरवासीयांचा विश्वास बसला दरम्यान वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी पिंजरे लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न जारी ठेवला तोपर्यंत काही भटके कुत्रे वासरू आणि बोकड बिबट्याने फर्स्ट केल्याच्या घटना घडल्या. अखेरीस बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास टेकडीवर पिंजरा लावलेल्या परिसरात वनविभागाचे अधिकारी गस्त घालीत असताना बिबट्या पिंजन्यात शिरला आणि अलगद अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.