

Nandurbar local body elections 2025
नंदुरबार: नंदुरबार नगरपालिकेच्या एकुण ४१ पैकी २१ जागांवर महिला आरक्षण काढण्यात आले आहे. यात सर्वसाधारण संवर्गासाठी १२, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला प्रवर्गासाठी ६, अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती महिलांसाठी २, अनुसूचित जमातीसाठी २ तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी ३ जागा राखीव झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा येथील नगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. या जाहीर झालेल्या आरक्षणावर हरकती घेण्यासाठी दि.९ ते १४ ऑक्टोबर मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी अंतीम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.
नंदुरबार नगरपालिकेत एकूण २० प्रभाग असून एकूण ४१ उमेदवार निवडून येणार आहेत. यापैकी १ ते १९ प्रभागात प्रत्येकी दोन तर प्रभाग क्रमांक २० मध्ये तीन नगरसेवक राहणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यासाठी आज (दि.८) येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात प्रांताधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्याधिकारी राहूल वाघ, लेखाधिकारी निकिता जगताप यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी लहान मुलांच्या हस्ते प्रभागनिहाय आरक्षणाच्या सोडतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.
प्रभाग १ अ अनुसूचित जमाती, १ ब सर्वसाधारण महिला, २ अ- ना.मा.प्र. महिला, २ ब-सर्वसाधारण, ३ अ-अनुसूचित जाती महिला, ३ ब- सर्वसाधारण, ४ अ-अनुसूचित जमाती, ४ ब-सर्वसाधारण महिला, ५ अ-ना.मा.प्र. महिला, ५ ब-सर्वसाधारण, ६ अ-ना.मा.प्र. महिला, ६ ब-सर्वसाधारण, ७ अ-ना.मा.प्र., ७ ब-सर्वसाधारण महिला, ८ अ-अनुसूचित जमाती महिला, ८ ब- सर्वसाधारण, ९ अ-अनुसूचित जमाती महिला, ९ ब-सर्वसाधारण, १० अ-ना.मा.प्र., १० ब- सर्वसाधारण महिला, ११ अ- ना.मा.प्र., ११ ब- सर्वसाधारण महिला, १२ अ-सर्वसाधारण महिला, १२ ब- सर्वसाधारण, १३ अ- अनुसूचित जाती, १३ ब- सर्वसाधारण महिला, १४ अ- ना.मा.प्र. महिला, १४ ब- सर्वसाधारण, १५ अ- ना.मा.प्र., १५ ब- सर्वसाधारण महिला, १६ अ- ना.मा.प्र. महिला, १६ ब- सर्वसाधारण, १७ अ- अनुसूचित जमाती महिला, १७ ब- सर्वसाधारण, १८ अ-अनुसूचित जाती महिला, १८ ब-सर्वसाधारण, १९ अ- ना.मा.प्र., १९ ब- सर्वसाधारण महिला, २० अ- ना.मा.प्र. महिला, २० ब- सर्वसाधारण महिला, २० क- सर्वसाधारण.
दरम्यान, प्रभागाचे आरक्षण उद्या दि.९ रोजी प्रकाशित करण्यात येणार असून दि.९ ते १४ ऑक्टोबर या काळात या प्रभाग आरक्षणाबाबत हरकती घेण्याची मुदत आहे. या मुदतीत आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकार्यांमार्फत सुनावणी होवून अंतीम प्रभाग आरक्षण दि. २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.