Nandurbar : नंदनगरीत प्रथमच 1001 दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाची महाआरती

संगमतीर्थ गंगाजलच्या एक लाख बाटल्यांचेही होणार वितरण
नंदुरबार
प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलशाबाबत माहिती देतांना आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित(छाया : योगेंद्र जोशी)
Published on
Updated on

नंदुरबार : प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने 1001 दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा आज रविवार (दि.9) रोजी पार पडणार आहे. अशी माहिती देतानाच हा 21 व्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदनगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे.

खोडाई माता रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आवाहन केले. या प्रसंगी त्यांच्या समावेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विक्रांत मोरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, माजी नगरसेवक चारूभाऊ कळवणकर, प्रशांत चौधरी, युवा नेते प्रथमेश शिरीष चौधरी, सुभाष पानपाटील, अनुगामी लोकराज्य महा अभियान म्हणजे अनुलोमचे ॲड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक,), भाजयुमोचे निलेश चौधरी व अन्य उपस्थित होते.

आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुढे सांगितले की, अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून आम्हाला त्यात सहभागी करून घेतले व प्राधान्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो. प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने 1001 दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा रविवार (दि.9) सायं. 7 वा. पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा जवळ, नंदुरबार येथे होत आहे. त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या एक लाख बाटल्यांचे नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाईल. गंगाजलच्या बाटल्या कार्यक्रम स्थळी न देता घरोघर जाऊन प्रत्येक परिवाराला एक बॉटल प्रमाणे दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाश जोशी (भागवत कथाकार, नंदुरबार) तसेच स्वानंद ओक (अनुलोम, महाराष्ट्र राज्य प्रमुख) हे लाभले आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा आमदार, डॉ. विजयकुमार गावीत, अमळनेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, अमोल गायकवाड (उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक, अनुलोम) आयोजक ॲड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक, अनुलोम) संदिप ढोले (नंदुरबार विधानसभा भाग जनसेवक, अनुलोम) यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news