

नंदुरबार - ग्रंथ हे माणसाला अनुभव संपन्न बनवतात. माणुस हा समाजात चांगला वागला पाहीजे अशी भावना ग्रंथसंपदेतूनच रुजते. त्यामुळे वाचनसंस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहण्याची गरज ग्रंथोत्सवाचे उदघाटक अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागच्या ग्रंथालय संचालय. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, व नंदुरबार ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील कन्यादान मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय नंदुरबार ग्रंथोत्सवाला सुरवात झाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिपप्रज्वलन करुन ग्रंथोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक निबाजीराव बागुल, प्रा. उमेश शिंदे, ग्रंथालय महासंघाचे कार्यवाहक प्रविण पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमदास वळवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उदघाटक अप्पर जिल्हाधिकारी यांनी सध्याच्या काळातील वाचन संस्कृतीचे महत्व विषद केले. समाजात वागण्या बोलण्याची कार्यपद्धती ही ग्रंथ संपदेतून मिळत असल्याने ग्रंथ हे मानसाल अनुभव संप्पन बनवत असल्याचेही ते यावेळ बोलतांना ते म्हणाले. शिक्षण हे माणसला शिक्षित करते, मात्र शिक्षित माणसाला ग्रंथ वाचण्याखेरीज पर्याय नसतो असे सांगत सध्याच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती मागे पडत चालली असल्याचे सांगत सर्वांनीच वाचन संस्कृती अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
काहीही वाचा, कोणी इंद्रजीत सावंत वाचा, कोणी बाबा कदम, तर कोणी वि.वा शिरवाडकर मात्र आपल्यातील वाचनाची अभिरुची वाढवण्यासाठी वाचनाची गोडी कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहीजे यासाठीच अशा पद्धतीच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्या जात आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या वाक्याची गरज ओळखायला हवी. वाचनामुळे समोरच्याचे मन दुखवले जाणार नाही याचा विचार देखील केला पाहीजे. याठिकाणी ग्रंथ विक्रीची सोयही उपलब्ध करुन दिली. येथेचांगले पुस्तक आणि चांगले ग्रंथ उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांनीच याठिकाणी आवर्जून उपस्थिती लावण्याचे आवाहन देखील अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी केले.
तर अध्यक्षीय भाषणातून बोलतांना ज्येष्ठ साहित्यिक निंबाजी बागुल यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहीजे, यासाठी ग्रंथोत्सवाची चळवळ सुरु असल्याचे सांगत अशा ग्रंथोत्सवांना गर्दी पेक्षा दर्दींची उपस्थिती महत्वाची असल्याचे सांगितले. मोबाईल हातात आला म्हणजे ग्रंथाची गरज राहत नाही असे नाही. असे सांगत त्यांनी जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ठ ग्रंथ वाचनालयात उपलब्ध असल्याचे सांगत नव्या पिढाली वाचन संस्कृती कडे वळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन ग्रंथालय कार्यकर्त्यांना केले. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी आभार मानले तर किरण दाभाडे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर धनंजय गोगटे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन झाले.
नंदुरबार ग्रंथोत्सवाला ग्रंथदिंडीने सुरवात झाली. शनिवार (दि.22) रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील नेहरु पुतळा येथून ग्रंथदिंडीला सुरवात झाली. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थीनींनी ग्रंथदिडीतील ग्रंथ, साहित्य तसेच मान्यवरांचे औक्षण केले. यानंतर ग्रंथदिंडीला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी पुतळा, घोडामील मार्गे ही ग्रंथदिंडी कन्यादान मंगल कार्यालय येथे पोहचली. यावेळी उपस्थिती विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे वाचनाचे महत्व आणि ग्रथांच्या महतीचा गजर केल्याचे दिसून आले. यावेळी ज्येष्ठ साहीत्यिक निबींजीराव बागुल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे कोषाध्यक्ष, प्रविण पाटील, श्रीजी वाचानालयाचे संचालक संदीप चौधरी, प्रा. उमेश शिंदे, सुलभा महिरे, वर्षा टेंभेकर, धर्मसिंग वळवी, किशोर पाटील, यांच्यासह अभिनव विद्यालयचे मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल, शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.