नंदुरबार : डॉ. गावित यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

भालेर, खोंडामाळी येथे डॉ. गावित यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप
Dr. Heena Gavit
वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करताना डॉ. हिना गावित व डॉक्टर सुप्रिया गावित तसेच आदी मान्यवर.(छाया: योगेंद्र जोशी)

नंदुरबार - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा. खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि खोंडामाळी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Dr. Heena Gavit
भालेर शाळेत वह्या वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. (छाया: योगेंद्र जोशी)

कार्यक्रमाप्रसंगी भालेर आणि खोंडामाळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वह्या वाटप करण्यात आल्याने पालकांनी समाधान व्यक्त करुन डॉ. गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. व्यासपीठावर वही वाटप उपक्रमाचे आयोजकांसमवेत जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, क. पू. पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भालेरचे संस्था अध्यक्ष भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Dr. Heena Gavit
भालेर आणि खोंडामाळी येथील शाळेत वह्यांचे वाटप करण्यात आले.(छाया: योगेंद्र जोशी)

उपक्रमाच्या माध्यमातून क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय भालेर शाळेतील ५०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी ५ याप्रमाणे २ हजार ५०० वह्यांचे वाटप करण्यात आले. नूतन विद्यालय खोंडामळी १००० वह्या वाटप तर गायत्री माध्यमिक विद्यालय खोंडामळी शाळेत एक हजार वह्यांचे वितरण करण्यात आले आहे. माजी जि. प. सदस्य भिका पाटील, भालेरचे सरपंच प्रल्हाद पाटील, नगावचे शाणाभाऊ धनगर, बोराळ्याचे सरपंच नारायण भाई, हाटमोईदाचे उपसरपंच गौरव जमादार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news