Nandurbar Crime| अचानक तपासणी करून पोलिसांनी जप्त केला 39 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा

दारू वाहतुकीसाठी बनावट नंबर प्लेट वापरल्या जात असल्याचे उघड, दोन ठिकाणी कारवाई
Illegal Liquor Raid
प्रातिनिधीक छायाचित्रPudhari
Published on
Updated on

नंदुरबार- नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडबारा रस्त्यावर पोलिसांनी तब्बल 13 लाख 3 हजार 60 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त केली, त्याचबरोबर नवापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा-धनराट रस्त्यावर देखील तब्बल 26 लाख 800 रुपये किमतीची दारु वाहनासह जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश खलाणे यांना खांडबारा ते शेही रोडदरम्यान खांडबारा गावाकडून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा वाहनातून अवैध दारू साठा नेला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी लगेच पोलीस पथक कार्यरत करून खांडबारा ते शही दरम्यान एका शेतासमोर रोडाचे बाजुला सापळा रचला. त्यावेळी खांडबारा गावाकडुन आलेल्या संशयुक्त पांढऱ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला त्यांनी अडवले. तथापि चालक व त्याचा साथीदार गाडी सोडून पसार झाले.

पथकाने तपासणी करता वाहनाची नंबर प्लेट वरील क्रमांक हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. वाहनाचे चेसिस क्रमांकावरुन वाहनाचे मालकाची माहिती घेण्यात आली. सदर वाहनाची पथकाने तपासणी केले असता त्यामध्ये एकूण 13,06,060 रुपये किमतीचे देशी दारु, बिअर व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन एकुण तिन इसमांविरुध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात भा. न्या. संहिता कलम 318 (4) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई),83, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दिनांक 07/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नवापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा-धनराट रोडवर सुळी फाट्याजवळ क्रमांक MH 06 BW 4454 क्रमांकाच्या वाहनातून अवैध साठा नेला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक कार्यरत करून संशयित वाहन अडविण्यात आले. वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शिवाजी बाबूलाल चौधरी, वय 29 वर्षे, रा. बेटावद, ता. शिंदखेडा जि.धुळे असे सांगितले. त्यास वाहनात काय आहे बाबत विचारता भाताचे सालच्या गोण्या असल्याची माहिती दिली.

त्यावरुन पथकास त्याचेवर अधिकचा संशय बळावल्याने पथकाने सदर वाहनास तपासले असता त्यामध्ये एकूण 26,00,800 रुपये किमतीची रॉयल ब्लू नामक दारुचे एकूण 198 खोके असे वाहनासह जप्त करण्यात आले. सदरची कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. जयेश खलाणे, पोहेकों/राजु कोकणी, पोकों सागर चौधरी, शाम पेंढारे, लिनेश पाडवी, प्रकार अहिरे, दिनेश पावरा, पोउपनि मुकेश पवार, पोहेकों/जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवण, नितीन गांगुर्डे अशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news