नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदार संघ आहेत. या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात 32 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक 12 उमेदवार नवापूर विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी 3 उमेदवार शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 01-अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात एकूण 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 7 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.(Maharashtra assembly poll)
02-शहादा विधानसभा मतदार संघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 3 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
03- नंदुरबार विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
04- नवापूर विधानसभा मतदार संघात एकूण 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.