Kalicharan Maharaj : सैन्याने अहिंसा मानली तर देशाचे काय होईल?; राजकारणाचं हिंदूकरणं झालंच पाहिजे - कालीचरण महाराज

Nandurbar Hindu Sabha | नंदुरबार येथील सभेतून कालीचरण महाराज यांचा संदेश
Nandurbar Hindu Sabha
Nandurbar Kalicharan Maharaj SpeechPudhari
Published on
Updated on

Nandurbar Kalicharan Maharaj Speech

नंदुरबार: हिंदू राष्ट्र स्थापन व्हायचे असेल तर राजनीतीचे हिंदूकरण करणे आणि मतदारांनी हिंदू सैनिक बनणे काळाची गरज आहे. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने धर्म, अध्यात्म आणि संस्कृती विषयीच्या धारणा प्रत्येक हिंदू धर्मियाने समजून घेतल्या तरच ते शक्य आहे; असा संदेश कालिपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी नंदुरबार येथील विराट हिंदू धर्म जागृती सभेत दिला. याचे महत्त्व जाणले नाही तर चहू बाजूने माजलेल्या दृष्ट शक्ती तुमचा विनाश करतील हे स्पष्ट आहे; असा इशारा देखील कालीचरण महाराज यांनी दिला.

नंदुरबार येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभेला संबोधित करताना कालीपुत्र कालीचरण महाराज बोलत होते. नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल मैदानात ही सभा पार पडली. श्री शंकर वराडकर : राष्ट्रीय महामंत्री श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास मथुरा, ह भ प पू. श्री खगेंद्र महाराज बुवा, ह भ प पू. श्री उध्दव महाराज, कुकरमुंडा, हभप पू भागवताचार्य राजीव जी झा महाराज, पू. श्री विलास महाराज जोशी, पू श्री प्रतापदादा वसावे महाराज, पू श्री अजबसिंग पाडवी महाराज भाती संप्रदाय, रतनबारी, ह भ प पू. श्री श्यामजी महाराज उमरदे, हभप पू श्री देवेंद्र पांढारकर महाराज, शनिमांडळ, हभप पू पंडित रविंद्र पाठक गुरुजी आणि हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्म सेवक डॉक्टर नरेंद्र पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

Nandurbar Hindu Sabha
Nandurbar Crime | विमा एजंटचा धक्कादायक कारनामा; जिवंत विमाधारकाचा बनावट मृत्यू दाखवून एलआयसीत पावणेकोटींचा अपहार

हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्म सेवक डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी प्रास्तविक भाषणात, इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रा हिंदू सेवा सहाय्य समितीचे कार्य पोहोचवले जाणार असल्याची घोषणा केली. श्री कृष्णाची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी खानदेशातून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असेही घोषित केले.

कालीचरण महाराज यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दात धर्म, अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व याचा परस्पर संबंध विश्लेषित केला. त्यांनी सांगितले की, सुखाच्या मागे धावणारा प्रत्येक व्यक्ती ईश्वर प्राप्तीचे ध्येय नसलेल्या जनावरा सारखा असतो. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे आपल्या आतील दुर्गुणांचा आणि समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करतो, तो खरा हिंदू. आपला धर्म, आपली संस्कृती याविषयीची ही धारणा घट्ट बनवा. धारणा पक्की असेल तरच तुम्हाला अध्यात्म आणि धर्माच्या वाटेवर चालता येईल. अहिंसा जर सैन्य दलाने महत्त्वाची मानली तर देशाचे काय होईल? हिंदूंच्या हक्काचे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण आधी संघटित झालो पाहिजे.

Nandurbar Hindu Sabha
Nandurbar Fraud Case | म्युच्युअल फंडाच्या नावाखाली दांपत्याची 1.39 कोटींची फसवणूक; बँकेच्या सेवानिवृत्त व्यवस्थापकासह 3 जणांविरोधात गुन्हा

प्रत्येक मुस्लिम मतदार त्याच्या इस्लामसाठी जागृत राहून मतदान करतो. त्या बळावर इस्लामीकरण करण्यात ते अर्धे यशस्वी झाले आहेत. हिंदू मतदारांनीसुध्दा आपल्या वोट बॅंकेची ताकद निर्माण केली आणि राजनीतीचे हिंदूकरण केले, तरच हिंदुराष्ट्र स्थापन करणे शक्य होईल. म्हणून आज प्रत्येकाने हिंदुत्वाचे सैनिक बनणे काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news