

नंदुरबार : अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 2 येमेन नागरिकांसह जामिया इस्लामिया संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया मदरसा येथे आणखी कोणकोणते परराष्ट्रातील नागरिक राहतात याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या संस्थेतील कारभाराविषयी अनेक वर्षापासून शंका व्यक्त होत आल्या आहेत. परंतु आता प्रथमच कारवाई झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन येथील झाडाझडती घेण्याची मागणी केली असल्याचेही चौधरी म्हणाले.
त्याच्या सोबत त्याची पत्नी-खादेगा इब्राहीम कासीम अल-नाशेरी असे परिवारासह मुलाच्या औषधोपचारासाठी मेडीकल व्हिसा घेऊन दि.22 नोव्हेंबर 2015 रोजी अक्कलकुवा मधील अस्सलाम हॉस्पिटल, मोलगी रोड, अक्कलकुवा येथे त्यांच्या मुलाच्या वैदयकीय औषधोपचारासाठी आले होते. हा व्यक्ती खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी याच्या व्हिसाची मुदत ही दि. 06 डिसेंबर 2015 व त्याच्या परिवाराची व्हिसाची मुदत दि. 19 फेब्रुवारी 2016 रोजी पर्यंत वैध होती. परंतु हे येमेन कुटूंब त्यानंतरदेखील अस्सलाम हॉस्पिटल, मोलगी रोड, अक्कलकुवा येथील हॉस्पीटलमध्ये आंतररुग्ण म्हणून न राहता ते जामिया इस्लामिया इशातुल उलूम, अक्कलकुवा येथील संस्थापक व स्टाफच्या मदतीने सर्वसाधारण नागरिकांच्या रहिवासी क्वार्टर्स येथे अवैधपणे राहत असल्याचे निदर्शनास आले.
त्याचप्रमाणे हा व्यक्ती खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी हा त्याच्यी व्हिसाची मुदत संपली हे माहित असताना देखील दि. 04 जानेवारी 2016 रोजी मदरसा कुव्वतुल इस्लाम काटोल, भैसदेही, जिल्हा- बैतुल मध्यप्रदेश येथील वार्षिक समारंभाचे कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी गेला होता, ही बाब भैसदेही पोलीस ठाणे, जिल्हा बैतुल (मध्यप्रदेश) यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन या व्यक्तीला अटक केली होती. या गुन्हयात उच्च न्यायालय, जबलपुर खंडपीठ यांनी त्याची जामिनावर मुक्तता करुन त्याला व्हिजाची मुदतवाढ मिळेपर्यंत त्याने येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य करण्याबाबत आदेशित केले होते, परंतू हा खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य न करता तो पुन्हा कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना अवैधपणे न्यायालयाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करुन परिवारासह जामिया इस्लामिया इशातुल उलुम, अक्कलकुवा मधील अस सलाम हॉस्पीटल, मोलगी रोड, अक्कलकुवा मध्ये आंतररुग्ण असल्याचे वेळोवेळी भासवून सर्वसाधारण रहिवासी क्वार्टर्स येथे आजपर्यंत वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान त्याला न्यायालयाने, भैसदेही यांनी 03 वर्षे सश्रम कारावासाची व 1000/-रु दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यावर या व्यक्तीने अपर सत्र न्यायालय, भैंसदेही येथे अपिल दाखल केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
या येमेन कुटूंबियांचे अक्कलकुवा येथे वास्तव्य असताना खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी याचेकडेस दोन मुलींचा जन्म झाला. त्यापैकी एका मुलीची ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे जन्माची नोंद असून जन्म प्रमाणपत्रात आई वडीलांचा कायमचा पत्ता हा जामीया क्वार्टर्स, अक्कलकुवा असे नमूद आहे. तसेच या व्यक्तीच्या दोन्ही मुलींचा पासपोर्ट देखील तयार करुन घेण्यात आला होता. तसेच मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावर भारतीय नागरिकत्व नमुद केलेले असल्याचे निदर्शनास आले असून या कुटूंबाने त्यांच्याकडे कोणताही वैध व्हिसा नसताना महत्वाचे दस्तऐवज हे जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था यांचे मदतीने तयार करुन घेतले आहेत. त्याचप्रमाणे खालेद इब्राहीम सालेह अल-खदामी व त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासीम अल नाशेरी यांनी त्यांच्या कडील व्होडाफोन कंपनीचे मोबाईल सिम हे शेख अबरारूल हक शेख निसार, रा. जामीयानगर, अक्कलकुवा, यांच्या नावाने विकत घेवुन ते कंपनीची फसवणूक करुन वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. या गुन्हयाचा पुढील तपास दर्शन दुगड, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अक्कलकुवा उपविभाग हे करीत आहेत.