महागडा मोबाईल स्वस्तात विकला आणि मोबाईल चोरटा अलगद सापडला

सव्वा लाखाचे हँडसेट केले जप्त
phone theft
मोबाईल चोरी Pudhari File Photo
Published on
Updated on

नंदुरबार - महागडे मोबाईल एकजण स्वस्तात विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यावर ताबडतोब पोलिसांनी जाऊन त्याच्यावर झडप घातली आणि चौकशी केली तेव्हा मोबाईल चोरीची मोठी घटना उघड झाली. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यामुळे यश मिळाले आहे.

याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. 26/02/2025 रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रामचंद्र बठीजा यांच्या मोबाईल शॉपीतुन अज्ञात चोरटयानी दुकानाचे कुलूप तोडून मोबाईल्स चोरुन नेले होते. शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 150/2025 भा.न्या. संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 06/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा तालुक्यातील चिरखान गावात एक इसम महागडे मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नरेश ऊर्फ लाला दादला पावरा, वय 23 वर्षे, रा.चिखली, पोस्ट मंदाणा, ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत दोन नविन मोबाईल आढळले तेव्हा सदरचे मोबाईल हे त्याचे साथीदार सुकलाल ऊर्फ मेंढी, मोठा शेमळे, सागर छगन भिल, शंभू कुवरसिंग चव्हाण, सर्व राहणार चिरखान ता. शहादा जि नंदुरबार यांचेसह शहादा शहरातील काशिनाथ मार्केट परिसरातील एका बंद दुकानाचे शटर उचकावून चोरी केली असल्याचे सांगितले. तरी वर नमुद आरोपीकडुन एकुण 01,26,700/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकुण 13 मोबाईल्स हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले मिळाले असुन पुढील अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोहेकॉ/मोहन ढमढेरे, पोना/पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, अविनाश चव्हाण, पोशि/दिपक न्हावी यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news