Dr. Vijaykumar Gavit : आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार

विरोधकांवर निशाणा; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावित गटाचं शक्तिप्रदर्शन
नंदुरबार
अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, सदस्य, सरपंच-उपसरपंच व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यापक सहविचार सभेत माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.Pudhari News Network
Published on
Updated on

नंदुरबार : आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडली आहे. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, सदस्य, सरपंच-उपसरपंच व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यापक सहविचार सभेत ते बोलत होते. या सभेला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, गावित गटाचं भव्य शक्तिप्रदर्शन घडवून आणलं.

डॉ. गावित म्हणाले, विरोधकांना गैरप्रकारांची सवय असून त्यांच्यावर चौकशीच्या फेऱ्या सुरू आहेत. लवकरच हे लोकप्रतिनिधी अडचणीत सापडतील. तसेच महायुतीचे घटक असूनही भाजपाच्या विरोधात काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नंदुरबार
Nandurbar Politics | डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात धडगावमध्ये राजकीय भूकंप

स्वबळाचा निर्णय का?

गावित म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुतीतील काही घटक पक्षांनी भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळेच आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. पक्षाच्या धोरणानुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया राबवली जाईल आणि भाजपाचाच विजय सुनिश्चित केला जाईल, असेही ते म्हणाले. आम्ही आमची ताकद फक्त पक्षासाठीच वापरली आहे आणि पक्षवाढीसाठीच लावणार आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

नंदुरबार
Manikrao Kokate: 'इडा पिडा टळू दे' ! साडेसाती मुक्तीसाठी कृषीमंत्री कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन

सहविचार सभेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दादा पाडवी, माजी सदस्य प्रताप वसावे, किरसिंग वळवी, तालुकाध्यक्ष नितेश वळवी, धनसिंग वसावे, महेश तवर, उमेश पाडवी, रोहित शुक्ला, भूषण पाडवी, भूपेंद्र पाडवी यांच्यासह सुनील पाडवी, सुधीर पाडवी, अशोक राऊत, दिलीप वसावे, रामसिंग वळवी, रुषा वळवी, आशाताई पाडवी, दीप्ती वळवी, रोशन पाडवी, बबुवा राणा, राजू तडवी, विशाल तडवी, जगदीश वसावे, हिलाल वळवी, वीरसिंग वळवी, आपसिंग पाडवी, भीमसिंग तडवी, आकाश वसावे, नवलसिंग वळवी, आशिष वळवी, पांडुरंग वळवी यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news