

नंदुरबार : भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार शहरात प्रचारफेरी काढल्यामुळे या परिसरातील वातावरण महायुतीमय झाले आहे.
विविध प्रकारची निवडणूक गीते, फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणींप्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती व मान्यवरांच्या प्रचारफेरीतील सहभागामुळे डॉ. गावित यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार शहरातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी डॉ. गावित यांनी मंगळवारी सकाळी प्रचार फेरी काढली. मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले. मागील ३० वर्षांपासून चालू असलेला नंदुरबार शहराचा आणि जिल्ह्याचा विकास कायम राखण्यासाठी विजयकुमार गावित यांच्यासारख्या नेत्यालाच पुन्हा निवडून द्या, असे आवाहन प्रचार फेरीतील पदाधिकारी करत होते.
भाजपचे तालुकाध्यक्ष जे. एन. पाटील, डॉ. विक्रांत मोरे, माजी उपनगराध्यक्ष श्याम बापू मराठे, माजी गट नेते चारुदत्त कळवणकर, मोहन खानवाणी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, माणिक माळी, नरेंद्र माळी, संतोषभाऊ वसईकर, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पानपाटील, केतनभैया रघुवंशी, धनराज गवळी, पावभा मराठे, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त युवराज पाटील, जगदीश पाटील, संजू भाई शहा, जितेंद्र मराठे, योगेश पाटील, सपना अग्रवाल, संगीता सोनवणे, काजल मच्छले, सरिता चौधरी, दिव्या जोशी, रत्ना चौधरी, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, नीलेश चौधरी व अन्य पदाधिकारी व नागरिक या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
सकाळच्या सत्रात मोठा मारुती मंदिर, शक्ती सागर मंडळ, अमर टॉकीज, अमृत टॉकीज, गोकुळ लस्सी, छत्रपती पुतळा पूजन, इंदिरा बँक, सुभाष चौक, सतलज हॉटेल, हनुमान व्यायाम शाळा, सिद्धी विनायक मंदिर, बुरुड गल्ली, भोई गल्ली, चैतन्य चौक, चौहान चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोहिनूर टॉकीज, जळका बाजार, शिवाजी चौक तयकील वाडी तांबोडी गल्ली सुरभी हॉटेल, न्यू इंडिया स्टोर्स तूप बाजार, माणिक चौक, कापड बाजार शाळा, नवी नगरपालिका, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, गणपती मंदिर, सोनार खुंट, ब्राह्मणवाडी या परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली.
दुपारच्या सत्रात विरल विहार, सार्वजनिक गणेश मंडळ, काका पतपेढी, परदेशपुरा, शेतकीसंघ, मारुती व्यायामशाळा, रायसिंगपुरा, पोरवालवाडी या भागातून प्रचारफेरी काढण्यात आली.