मंत्री डॉक्टर गावित यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना दिवाळीची मोठी भेट !

मिळणार 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य
Big Diwali gift to construction workers!
नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला.
Published on
Updated on

नंदुरबार - बांधकाम कामगारांसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दीपावलीची मोठी भेट दिली आहे. ही आनंदाची मोठी बातमी अशी की डॉ. गावित यांच्या प्रयत्नामुळे बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि. 10 झाला. या वृत्ताला स्वतः मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दुजोरा दिला.

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कामगार महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांच्या पाठोपाठ आता सर्व नोंदणीकृत कामगारांना 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळवून दिले असून क्रांतिकारी निर्णय करीत महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली आहे. बांधकाम कामगारांना एका वेळी एवढे मोठे अर्थसहाय्य मिळण्याची कदाचित ही पहिली घटना असावी. यामुळे ही बातमी पसरताच नंदुरबार जिल्ह्यातून नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या बद्दल विशेष भावना व्यक्त होताना दिसल्या.

बांधकाम कामगारांना सुरक्षा संच माध्यमातून विविध वस्तूंचा लाभ देणारी योजना त्यांनी नुकतीच राबवली आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 25000 जणांना त्याचा लाभ झाला. त्याचबरोबर 30 भांड्यांचा संच देखील त्यांनी नुकताच वाटप केला आणि त्याचा प्रत्येक तालुक्यातील शेकडो महिलांना लाभ झाला. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून सुमारे एक लाख महिलांना त्यांनी लाभ मिळवून दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कामगारांना दसरा आणि दिवाळीच्या प्रसंगी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार म्हटल्यावर अधिकच वातावरण निर्मिती बनली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news