नाशिक: ‘माकप’चे लाल वादळ विधानभवनावर धडकणार; दिंडोरीतून लाँग मार्चला सुरूवात

नाशिक: ‘माकप’चे लाल वादळ विधानभवनावर धडकणार; दिंडोरीतून लाँग मार्चला सुरूवात
Published on
Updated on

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथून मुंबईतील विधानभवनावर आज (दि. १२) लाँग मार्च काढण्यात आला. दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केटपासून या मार्चला सुरुवात झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मार्चचे स्वागत तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे, देविदास वाघ यांनी केले. यावेळी रस्ता रोखून रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मार्चचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे होणार आहे. या मार्चमध्ये १० हजार महिला, पुरुष सहभागी झाले आहेत.

यावेळी डॉ. डी. एल. कराड, माकपचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव, सुभाष चौधरी, उत्तम कडू, देविदास वाघ, भिका राठोड, जयराम गायकवाड, आदी मार्चचे नेतृत्व करत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तीन तास वाहतूक ठप्प

गुजरात राज्याला जोडणारा नाशिक – सापुतारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवार दिंडोरी बाजार व रंगपंचमी असल्यामुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र व सप्तश्रृंगी गड येथे येणाऱ्या भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या खालीलप्रमाणे – 

  • जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारावर नावावर लावावा.
  • अपात्र जमीनदाव्याची पूर्तता करून दावे पात्र करावेत.
  • प्रत्येक मंजूर प्लॉट धारकाला विहीर, सोलर वरील वीज पंप, पाईपलाईन, जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवड सारख्या केंद्र सरकारने प्लॉट धारकांना जाहीर केलेल्या योजना राबवाव्यात.
    गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.
    ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत, ती घरे नियमित करा.
    प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान १ लाख ४० हजारांवरुन ५ लाख रूपये करावे,
    वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्व्हे करून त्यांची नावे 'ड' यादीत समाविष्ट करावीत.
    नार पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे मोठे सिमेंट काँक्रेटचे बंधारे, पाझर तलाव, लघु पाटबंधारे यासारखे प्रकल्प उभारावेत.
    कांदा, द्राक्ष व इतर शेती पिकांना हमीभाव मिळावा.
    लाल कांद्याला ६०० रूपये अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करा.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news