Share market fraud: शेअर मार्केटच्या आमिषातून तरुणीची १० लाखांची फसवणूक

विनयभंगाचा धक्कादायक प्रकार
Share market fraud
Share market fraudfile photo
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ शहरातील एका २७ वर्षीय तरुणीची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा तसेच लग्नासाठी दबाव टाकून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी भुसावळ शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासह राहते. सन २०२० मध्ये संशयित आरोपी सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याची तिच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या डी-मॅट खात्याची माहिती व क्रेडिट कार्डचा वापर करून सुमारे १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर आरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत मुंबई ते मंगळूरपर्यंत तिचा पाठलाग केला. तसेच फिर्यादीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. यासोबतच तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news