

जळगाव | महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री ठरले मात्र पालकमंत्री पदाचा तिढा काही आजून सुटेना. जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे राहील यावर अजूनही फक्त चर्चाच सुरू आहे. यामुळे येत्या मार्च महिन्यामध्ये किती निधी शासनाला परत जाणार व किती निधीवर काम होईल याचे नियोजन रखडलेले आहे. असे असताना जिल्ह्यात भाजपा शिंदे गट यांचे बलाबल समसमान असताना जिल्हा व जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागलेले आहे.
महायुतीचे सरकार राज्यात आल्यापासून विचार मंथन मोठ्या प्रमाणात होत आहे. सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार तेव्हापासून तर आता पालकमंत्री व जिल्ह्याचे पालकत्व कोणाला द्यायचे यावरही अजूनच मंथनच सुरू आहे. या मंथनामध्ये जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन बैठकीवर परिणाम झालेला दिसून येत आहे जिल्हा नियोजनाची बैठक न झाल्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये येणाऱ्या मार्च महिन्यात शासनाचा किती निधी परत जाणार किती योजनांमध्ये काम झालेले नाही किती योजनांमध्ये निधी पडलेला आहे यामुळे तो मार्च आधी कसा खर्च करता येईल व ती कामे कशी लवकरात लवकर पूर्ण होतील यावर नियोजनाची बैठक होणे फार गरजेचे आहे मात्र पालकत्व नसल्यामुळे किंवा पालकमंत्री जिल्ह्यात नसल्यामुळे चार मंत्री असलेला जिल्हा म्हणजे एक केंद्रीय राज्य मंत्री व तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री असूनही जळगाव जिल्हाचे पालक कोण बनणार यावर अजूनही शिक्का मोर्तब झालेला नाही त्यामुळे चार मंत्री असूनही विकासाची घोडदौड पाहिजे तशी जिल्ह्यात सुरू झालेली नाही.
भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे संकट मोचक आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे असे मंत्री जळगाव जिल्ह्याला लाभलेले असूनही अजूनही विकासाची घोडदौड पाहिजे तशी सुरू झालेली नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार 10 दिवसांनी 26 जानेवारीला कोण ध्वजारोहण करणार याकडे सर्व लक्ष लागून आहे. गेल्या वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते यावेळेस भुसावळ की जळगाव ग्रामीण यांच्याकडे पालकत्व जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.