६८ वर्षांच्या 'आजोबां'चा काहुरखेड्यात दहशतीचा खेळ; वरणगाव पोलिसांकडून शस्त्रांचा साठा जप्त

२ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे अन् तलवार जप्त; 'मेड इन स्पेन'ची चमक दाखवणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा शिवारात शुक्रवारी सायंकाळी वरणगाव पोलिसांनी कारवाई करत एका ६८ वर्षीय वृद्धाला शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह रंगेहाथ पकडले. परिसरात दहशत माजविण्याच्या आणि मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या या 'शस्त्रधारी' आजोबांकडून २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि एक धारदार तलवार असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काहुरखेडा शिवारातील मानपूर रोडवरील सोलर प्लांटजवळ असलेल्या तलावाकाठच्या शंकर मंदिराजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. यावेळी संशयित आरोपी अशांक जगन्नाथ कोळी (वय ६८, रा. मांगलवाडी, ता. रावेर, ह.मु. काहुरखेडे) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा एक राखाडी रंगाचा गावठी कट्टा मिळाला आहे. त्याच्या बॅरेलवर इंग्रजीत 'MAID IN SPIAN' असे लिहिलेले आहे.

यासोबतच ४० हजार रुपयांचा दुसरा काळा कट्टा, ८ हजार रुपयांची ४ जिवंत काडतुसे आणि ५ हजार रुपये किमतीची ३२ इंची पोलादी तलवार असा एकूण ९३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई वरणगाव पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार यासिन पिजारी आणि सपोनि अमितकुमार बागुल यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news