Jalgaone News
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकी आणि तसेच ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपीPudhari Photo

दुचाकी चोरट्यांना जळगाव एलसीबीकडून अटक

4 मोटर सायकलसह दोन आरोपी ताब्यात
Published on

जळगांव : जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने वाढत होत्या. याची खबरदारी घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त आणि एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याणे होळ ता. धरणगाव) आणि गोपाल सुरेश भिल (वय २२, रा.वराड ता. चोपडा) या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jalgaone News
वेंगुर्ले पोलिसांकडून दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दापाश

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या प्रमाणावर गाळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. या धर्तीवर पोलिसांना एक युवक चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याच्या मागावर जाऊन त्याला कल्याणे होळ येथून ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. यानंतर त्याने आणि त्याच्या साथीदाराने मोटारसायकल चोरी केल्याची माहिती उघडकीस आली. यानंतर दोघांकडून चार दुचाकी जप्त आणि एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आणखी एका दुचाकी शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Jalgaone News
कारागृहातून सुटताच दुचाकी चोरी

हि सदर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अर्धाक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले होते. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांनी पोउपनिरी राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, महेश सोमवंशी याचे पथक तयार केले होते. या पथकाने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news