

केंद्र सरकारच्या नाफेड योजनेअंतर्गत २०२४-२५ या खरीप हंगामासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
(Tur Purchase Centers Jalgaon)
जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या १६ केंद्रांवर नोंदणी सुरू आहे.
खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असून, तुरीचा हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाईन पीकपेरा असलेला ७/१२ उतारा व ८ अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार आणि प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.