Traffic Police Action : विशेष पोलिस मोहिमेत ६८१ वाहनचालकांवर कारवाई; ५.१६ लाखांचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ६८१ प्रकरणे नोंदविण्यात आली
Traffic Police Action
Traffic Police Action : विशेष पोलिस मोहिमेत ६८१ वाहनचालकांवर कारवाई; ५.१६ लाखांचा दंडfile photo
Published on
Updated on

Traffic police action: Action taken against 681 motorists in a special police drive; fines totaling ₹5.16 lakh imposed

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभागातर्फे 22 रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या नियमभंग प्रकरणांवर व्यापक कारवाई करण्यात आली.

मोहिमेत वाईन शॉपसमोर मद्यपान करणाऱ्या ५ जणांवर, तर मोकळ्या मैदानावर मद्यपान करणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली. खाद्य स्टॉलसमोर मद्यपान करणाऱ्या २ जणांविरुद्धही कारवाई करण्यात आली.

शाळा व महाविद्यालय परिसरात वेगाने वाहन चालविणे व कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल, ढाबे, लॉजेस व ओयो हॉटेल्सची तपासणी मोहीम राबवून १५३ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. याशिवाय १९ कॅफेंचीही पाहणी करण्यात आली.

शाळा व महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर तपासणी करून कोपटा कायद्यांतर्गत ७१ कारवाया करण्यात आल्या. मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत (बी.पी. अॅक्ट कलम ११०/११२) ४४ प्रकरणांमध्ये कारवाई केली.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ अंतर्गत ७ कारवाया करण्यात आल्या. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ६८१ प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news