

जळगाव : धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अयोध्या परिसरातील सुलतानपूरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंप्राळा, जळगाव येथील छोटीबाई पाटील या महिलेचा मृत्यू झाला असून तीस भाविक जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, कल्याणेहोळ येथील तीस महिला आणि पाच पुरुष अशा भाविकांचा गट अयोध्यासह काशी परिसरातील दर्शनासाठी गेला होता. त्यांच्यासोबत जळगावमधील काही भाविक होते. सर्वजण रेल्वेने काशी येथे पोहोचले. त्यानंतर पुढील प्रवासासाठी घेतलेल्या वाहनाला सुलतानपूरजवळ अपघात झाला.
जखमींवर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू केले. मृत महिलेचे पार्थिव आणि जखमी भाविकांना जळगावला आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जखमींची नावे अशी...
संजय प्रताप पाटील, भारत दगडू पाटील, साहेबराव शेनफडू पाटील, पदम हरसिंग पाटील, दगडू धुडकू पाटील, सुमनबाई बुधा पाटील, सुमित्रा भारत पाटील, आशाबाई साहेबराव पाटील, निता महेंद्रसिंग पाटील, अर्चना सुधाकर पाटील, संगिता रवींद्र पाटील, रंजना विजय पाटील, इंदुबाई मधुकर पाटील, योजना पदम पाटील, आशा बालू पाटील (सर्व रा. कल्याणे खुर्द, ता. धरणगाव, जि. जळगाव), अशी अपघातात जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत.